Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट अजूनही दाट आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणित मोठी वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 124331 वर पोहचला असून एकूण 5893 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तर 55651 रुग्णांवर उपचार सुरु असून 62773 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पुणे (Pune) या शहरांभोवती असलेला कोविड-19 चा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. कोरोना व्हायरस संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारसह आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. (भारतामध्ये 24 तासांत सर्वाधिक 14516 नवे रूग्ण तर 375 जणांचा मृत्यू; COVID-19 बाधितांची संख्या 395048 वर)

दरम्यान महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून राज्याच्या विविध जिल्ह्यात कोरोना व्हायरस रुग्णसंख्या, मृतांचा आकडा किती आहे जाणून घेऊया. कोरोना रुग्णांची जिल्हा आणि मनपा निहाय आकडेवारी ही महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आली आहे. ही आकडेवारी 19 जून सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे.

COVID-19 पॉझिटीव्ह रुग्णांची जिल्हा/मनपा निहाय यादी:

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
1 मुंबई महानगरपालिका 64139 3425
2 ठाणे 2396 47
3 ठाणे मनपा 6941 213
4 नवी मुंबई मनपा 5423 151
5 कल्याण डोंबवली मनपा 3461 77
6 उल्हासनगर मनपा 885 37
7 भिवंडी निजामपूर मनपा 837 51
8 मीरा भाईंदर मनपा 2090 99
9 पालघर 514 16
10 वसई विरार मनपा 2515 72
11 रायगड 1025 37
12 पनवेल मनपा 1242 52
ठाणे मंडळ एकूण 91468 4277
13 नाशिक 454 20
14 नाशिक मनपा 1144 36
15 मालेगाव मनपा 917 81
16 अहमदनगर 200 11
17 अहमदनगर मनपा 61 1
18 धुळे 207 29
19 धुळे मनपा 272 25
20 जळगाव 1665 152
21 जळगाव मनपा 453 27
22 नंदूरबार 83 6
नाशिक मंडळ एकूण 5456 388
23 पुणे 1109 33
24 पुणे मनपा 12255 545
25 पिंपरी चिंचवड मनपा 1340 32
26 सोलापूर 172 53
27 सोलापूर मनपा 1941 132
28 सातारा 810 34
पुणे मंडळ एकूण 17627 829
29 कोल्हापूर 707 8
30 कोल्हापूर मनपा 30 0
31 सांगली 259 10
32 सांगली मिरज कुपवाड मनपा 15 1
33 सिंधुदुर्ग 161 3
34 रत्नागिरी 474 18
कोल्हापूर मंडळ एकूण 1646 40
35 औरंगाबाद 237 32
36 औरंगाबाद मनपा 2927 144
37 जालना 327 12
38 हिंगोली 243 1
39 परभणी 56 4
40 परभणी मनपा 27 0
औरंगाबाद मंडळ एकूण 3817 193
41 लातूर 152 10
42 लातूर मनपा 57 3
43 उस्मानाबाद 166 8
44 बीड 82 2
45 नांदेड 52 2
46 नांदेड मनपा 219 10
लातूर मंडळ एकूण 728 35
47 अकोला 121 16
48 अकोला मनपा 1024 40
49 अमरावती 34 2
50 अमरावती मनपा 371 25
51 यवतमाळ 222 5
52 बुलढाणा 154 5
53 वाशिम 67 3
अकोला मंडळ एकूण 1993 96
54 नागपूर 139 0
55 नागपूर मनपा 1052 13
56 वर्धा 14 1
57 भंडारा 71 0
58 गोंदिया 101 0
59 चंद्रपूर 38 0
60 चंद्रपूर मनपा 20 0
61 गडचिरोली 52 1
नागपूर एकूण 1487 15
इतर राज्ये /देश 109 20
एकूण 124331 5893

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे यापूर्वीचे अनेक सण लॉकडाऊनमुळे घरच्या घरी साजरे करावे लागले. तर पुढे येणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक सणांची रेलचेल असते. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर येथील राम कदम यांची दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. तर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना खास सूचना केल्या आहेत.