Coronavirus in Maharashtra: मुंबई, ठाणे येथे कोरोनाचे दोन नवे रुग्ण; राज्यात कोरोना व्हायरसग्रस्तांचा आकडा 124
Coronavirus | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) थैमानामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असताना कोरोना व्हायरसच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. मुंबई (Mumbai) आणि ठाण्यात (Thane) कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 124 झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.

कोरोनाबाधितांचा वाढणारा आकडा चिंताजनक आहे. तर त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्ग रोखण्यासाठी गरजेशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. या आवाहनाला काही ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असला तरी अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसंच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांची पोलिसांकडून अडवणूक होत आहे. गरज पडल्यास लाठ्यांचा मारही दिला जात आहे. (जीवनावश्यक वस्तुंची दुकानं बंद राहणार नाहीत, नागरिकांनी गर्दी टाळावी - उद्धव ठाकरे)

ANI Tweet:

देशात कोरोना बाधितांचा आकडा 600 च्या पार गेला असून राज्यातील रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे सरकारकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. मात्र काही अडचण आल्यास +91 2026127394 नंबर वर व्हॉटस्अॅप चॅटबॉटवर तुम्ही प्रश्न विचारु शकता. तुमच्या शंकांचे निरसन करण्यात येईल.