Coronavirus In Dharavi: मुंबईतील धारावीत आढळले फक्त 4 कोरोनाबाधित रुग्ण, महापालिकेची माहिती
Coronavirus Outbreak | Representational Image | (Photo Credits: IANS)

मुंबईतील धारावीत (Dharavi) कोरोनाचे मंगळवारी फक्त 4 रुग्ण आढळून आल्याने आकडा 2676 वर पोहचला आहे. याबद्दल महापालिकेने (BMC) माहिती दिली आहे. धारावी ही आशिया खंडातील सर्वाधिक मोठी झोपडपट्टी असून तेथे आता सिंगल डिजिट मध्ये रुग्णांची संख्या आढळून येत आहे. तर सोमवारी सुद्धा धारावीत कोरोनाचे 4 रुग्ण आढळले होते. दरम्यान, 3 ऑगस्टला धारावीत 12 आणि 5 ऑगस्टला एका रुग्णासह 10-12 ऑगस्टला क्रमश: 9 रुग्णांची नोंद झाली होती.(Coronavirus Update: महाराष्ट्र पोलिस दलात 24 तासात 112 नवे कोरोना रुग्ण, 2 मृत्यु; एकुण कोरोनाबाधितांची संंख्या 12,495 वर)

 धारावीत 6.5 लाखांहून अधिक नागरिक राहत असून 2.9 स्क्वेअर किलोमीटर मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पसरला आहे. सध्या धारावीतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 2676 असून त्यापैकी 2333 जणांची प्रकृती सुधाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या धारावीत कोरोनाचे 84 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्याचसोबत जून महिन्यापासून धारावीत कोरोनाच्या बळींचा आकडा कमी झाला आहे. एकूणच जी-नॉर्थ वॉर्ड म्हणजेच धारावी, दादर आणि मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 6951 वर पोहचला आहे.(Alibaug Roro Ferry: अलिबाग कडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर! येत्या 20 ऑगस्ट पासून रोरो फेरी पुन्हा होणार सुरु)

दरम्यान, महाराष्ट्रात आज कोरोनाचे आणखी 11,119 रुग्ण आढळले असून 422 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 9356 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6,15,477 वर पोहचला असून त्यात 20,687 जणांचा बळी सुद्धा गेला आहे. तसेच 4,37,870 जणांची प्रकृती सुधारली असून 1,56,608 अॅक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.