कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान जरी घातले असले तरीही अनलॉकिंगच्या नुसार काही गोष्टी सुरु करण्यास आता सरकारने परवानगी दिली आहे. याच दरम्यान आता दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी बहुसंख्येने नागरिक मुंबईसह विविध शहरातील नागरिक हे कोकणात जात आहेत. नागरिकांना कोकणात जाता यावे यासाठी एसटी बस आणि आता विशेष 5 रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत. याच दरम्यान आता अलिबागकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे. कारण अलिबाग, मांडवा येथे ज्यांची जायची इच्छा आहे त्यांच्यासाठी येत्या 20 ऑगस्ट पासून रो रो सेवा (Roro Ferry) पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
अलिबागमध्ये जाणाऱ्या नागरिकांसाठी रो रो सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या सेवेबद्दल 11 दिवसांचे वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे समुद्राच्या मार्गाने भाऊचा धक्का ते मांडवा अशा रो रो सेवेचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. रो रो सेवेच्या माध्यमातून नागरिकांना अवघ्या 45 मिनिटांत अलिबाग येथे पोहचता येणार आहे.(Ganeshotsav 2020 Special Train: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या विशेष ट्रेन्सला चाकरमान्यांचा अल्प प्रतिसाद)
दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. तर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना ई-पास घेणे अत्यावश्यक आहे. त्याचसोबत गावात गेल्यानंतर त्यांनी 10 दिवस क्वारंटाइन रहावे अशा सुचना सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभुमीवर चाकरमान्यांना देण्यात आल्या आहेत. तर सध्या पश्चिम रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी सोडण्यात आलेल्या रेल्वेगाड्यांच्या 20 फेऱ्या धावणार आहेत. ही सेवा सुरु झाल्यानंतर रेल्वे गाड्या जाताना रिकाम्या गेल्याचे दिसून आले. मात्र गंतव्य स्थानकातून पुन्हा मुंबईकडे येताना रेल्वेगाडी भरुन आल्याचे चित्र पहायला मिळाले.