Coronavirus In Maharashtra Police: महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव दिवसागणिक अधिक होत असताना डॉक्टरांसोबत मिळुन कोरोनाशी लढणारे पोलिस बांधव आता या विळख्यात जास्तच अडकताना दिसत आहेत. रोज महाराष्ट्र पोलिस दलात सरासरी 100हुन अधिक कोरोना रुग्णांंची वाढ होत आहे, कालच्या दिवसभरात सुद्धा तब्बल 112 नव्या कोरोना रुग्णांंची (Coronavirus Cases) भर पडुन एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 12,495 वर पोहचली आहे. मागील 24 तासात कोरोनाने 2 पोलिसांचा बळी देखील घेतला आहे परिणामी कोरोना मृतांंचा आकडा (Coronavirus Deaths) 128 इतका झाला आहे. सध्या कोरोनाचे एकुण 2,256 अॅक्टिव्ह रुग्ण (Coronavirus Active Cases) पोलिस दलात आहेत तर सुदैवाने 10,111 जणांंनी कोरोनावर मात केली आहे. Coronavirus Update: देशात 24 तासात 55,079 नवे कोरोना रुग्ण, 876 मृत्यु; एकुण कोरोनाबाधितांची संख्या 27,02,743 वर, पहा आजची आकडेवारी
महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात कोरोनाचे नवे 8493 रुग्ण आढळून आले असून एकुण कोरोनाबाधितांचा आकडा हा 6,04,358 वर गेला आहे. याशिवाय कालच्या दिवसात 228 जणांचा बळी गेल्याने आजवरच्या कोरोना मृतांची संख्या ही 20,265 वर पोहचली आहे.राज्यात कोरोनाचे एकूण 1,55,268 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर दुसरीकडे 4,28,514 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तुमच्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण? पहा आजची महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांंची जिल्हानिहाय आकडेवारी
ANI ट्विट
112 new #COVID19 positive cases and two deaths recorded in Maharashtra Police force, in the last 24 hours. Total positive cases stand at 12,495 including 10,111 recoveries, 2,256 active cases & 128 deaths: Maharashtra Police
— ANI (@ANI) August 18, 2020
राज्यात मुंबई, पुणे हे भाग अजुनही कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याचे दिसत आहेत महाराष्ट्रात सध्या कोरोनाबाधित रुग्णांंचा रिकव्हरी रेट आणि मृत्यु दर पाहिल्यास राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70. 9 टक्के एवढे आहे. तर, मृत्यूदर 3.35 टक्के एवढा आहे. या आकड्यांची सरासरी पाहता अजुनही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे असे म्हणता येईल.