Heritage Museum CSMT (PC - Wikipedia)

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे हेरिटेज संग्रहालय' (Chhatrapati Shivaji Terminus Railway Heritage Museum) महिना भरासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महिनाभरासाठी हे संग्रहालय बंद असणार आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिलं आहे.

'छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे हेरिटेज संग्रहालय' हे हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक संग्रहालय आहे. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झाल्याची 11 प्रकरणे समोर आली आहेत. केंद्र सरकारकडून तसेच राज्य सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना देण्यात येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी आपले दौरेही रद्द केले आहेत. (हेही वाचा - मुंबई: Coronavirus च्या वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर Fake Biotol हॅन्ड सॅनिटायझर विकणार्‍या व्यक्तीला कांदिवली मध्ये अटक; FDA ची कारवाई)

दरम्यान, राज्यात पुणे शहरात कोरोनाचे जास्त रुग्ण आढळल्याने तेथील काही शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईत कोरोना व्हायरसचे 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रासोबतच राजधानी दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि राजस्थान राज्यांमध्येही कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. सध्या कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार सुरू आहेत.