Ajit Pawar (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने राज्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. मात्र, तरीही राज्यात नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आज बैठक घेतली. या बैठकीत अजित पवार यांनी लॉकडाऊन लावण्याच्या संदर्भात महत्वाचा इशारा दिला आहे. तसेच पुण्यात कोरोना रुग्णांसाठी बेड्सची संख्या वाढवण्याच्या संदर्भातही त्यांनी चर्चा केली आहे.

कोरोना स्थितिचा आढवा घेण्यासाठी प्रत्येक आठवड्याला एक बैठक घेतली जाते. त्याचप्रमाणे आजही कोरोनाची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांच्यासह पुणे, पिंपरी-चिंचवडे महापौर, आरोग्य अधिकारी, भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत अजित पवार म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सहकाऱ्याची भूभिका घ्यावी. पुणेकर गर्दी करणार नाहीत, अशी अपेक्षा आहे. तसे नागरिकांनी कडक लॉकडाऊनची वेळ येऊ देऊ नका, अशी विनंतीही अजित पवार यांनी केली आहे. तसेच नागरिकांनी सहकार्य केले नाही तर, नाईलाजास्तव कडक लॉकडाऊन लावण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. हे देखील वाचा- Pune Coronavirus: वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुण्यात आरोग्य सुविधांची कमतरता; ससून रुग्णालयात एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार सुरु

महाराष्ट्रात सातत्याने वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची सख्या चिंताजनक आहे. राज्यात आज तब्बल 63 हजार 729 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 398 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या 37 लाख 3 हजार 584 वर पोहचली आहे. यातील 30 लाख 4 हजार 391 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 59 हजार 551 जणांचा मृत्यू झाला आहे.