Mumbai Police | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील 6 कर्मचाऱ्यांवर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात गेले दोन महिने सातत्याने नोटीस बजावूनही हे कर्मचाऱ्यांनी कर्तव्याची नोंद न घेतल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. हे 6 कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल (Police Constables) पदावर कार्यरत असून, मुंबई पोलीस (Mumbai Police) सेवेत असल्याचे सांगितले जात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, ज्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे त्यांची नावे समजू शकली नाहीत. तसेच, प्रशासनाने नोटीस बजावूनही या कॉन्स्टेबल्सनी कोणत्या कारणास्थव कर्तव्याची नोंद घेतली नाही हेही समजू शकले नाही. दरम्यान, या कर्मचाऱ्यांना प्रशासकिय चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संकट अधिक गहिरे होते आहे. संबंध देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातही मुंबई शहरात कोरोनाचे अधिक रुग्ण आहेत. त्यामुळे नागरिकांना गर्दी टाळा, लॉकडाऊन नियमांचे पालन करा, सोशल डिस्टन्सींग पाळा असे अवाहन सरकार आणि प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (हेही वाचा, लॉकडाऊनमध्ये विनाकारण प्रवास करणाऱ्या नागरिकांवर मुंबई पोलिसांची कारवाई; दिवसभरात तब्बल 16 हजार वाहने जप्त)

दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांचे आणि नियमांचे पालन करण्याची तसेच जनतेकडूनही हे नियम पाळले जात आहेत की नाही हे पाहण्याची मोठी जबाबदारी महाराष्ट्र पालीस दलावर आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी कर्मचारी कोठरपणे कर्तव्य पालन करत आहेत. जनसेवेसाठी 24 तास दक्ष असलेल्या पोलीस दलातील अनेकांना कोरोना व्हायरस संसर्गही झाला आहे. काहींवर उपचार सुुर आहेत. काही उपचार घेऊन बरे झाल्याने पुन्हा एकदा कर्तव्यपालनासाठी परतले आहेत. तर काहीचा यात मृत्यूही झाला आहे.