Coronavirus Outbreak (Photo Credits: AFP)

कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) गेल्या अनेक दिवसांपासून वाढतच चालला आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाबाधीतांची संख्या 97 वर पोहचली आहे. यातच सांगली (Sangli) येथे एकाच कुटुंबातील 4 जणांना कोरोनाती लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहे. तर, राज्यात कोरोनाने आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच मुंबई येथील लोकल सेवा, लांब पल्ल्याचा मेल एक्सप्रेस गाड्या बंद केल्या आहेत. तसेच लोकांना 31 मार्चपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून देशभरात आतापर्यंत 9 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाबाधीत लोकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोरोना व्हायरस शिरकाव केला असून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधीतांची संख्या 97 संख्यावर पोहचली आहे. हे चौघेही जण सौदी अरेबियातून आले आहेत. हज यात्रेसाठी सौदी अरेबियात गेले होते, सौदी अरेबियातून आल्यापासून क्वारंटाईन सेंटरमध्ये होते. चौघांचेही आज रिपोर्ट आले आहेत. हे चौघही कोरोनाबाधीत असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या चौघांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. एकाच वेळी कोरोनाचे चार रुग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हे देखील वाचा- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचाऱ्यांसह राज्य आणि केंद्र सरकारचे मानले आभार

देशातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा 9 वर पोहोचला आहे. आज (23 मार्च) पश्चिम बंगालमधील एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी महाराष्ट्रात 3, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, गुजरातमध्ये प्रत्येक एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.