CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. असे असताना देखील आज मुंबई, पुण्यातील लोकांनी या लॉकडाऊन कडे सपशेल पाठ फिरवत रस्त्यावर एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. सरकारने वारंवार सांगूनही जनतेचा असा प्रतिसाद पाहून अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. हा निर्णय मला नाईलाजास्तव घ्यावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्याला संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली.

सध्या आपण कोरोनाच्या निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच नियम मोडू नका अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असे कडक शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत.

हेदेखील वाचा- लॉकडाऊन करुन भागेल असे वाटत नाही संचारबंदी लागू करा; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती

ट्विट-

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या सीमा बंद केल्या आहेत. तसेच सर्व प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. तसेच सार्वजनिक वाहतूक असलेल्या रिक्षामध्ये आता एकाच प्रवाशाला बसण्याची मुभा असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर थाळ्या आणि टाळ्या वाजवणं म्हणजे व्हायरस घालवणे नाही असे कडक शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सुनावले आहे.

राज्यात 89 कोरोना बाधित रुग्ण आढळले असल्याने ही गोष्ट खूप गांभीर्याने लोकांनी घेतली पाहिजे. अन्यथा भारतातही कोरोना थैमान घालण्याची शक्यता आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्याचबरोबर या कठीण प्रसंगी सर्वांनी सहकार्य करावे यासाठी अंगणवाडी सेविका, होमगार्डचा वैद्यकिय सेवेसाठी वापर करण्यात यावा असे आदेशही देण्यात आले आहेत.