Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारत कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेवर झुंज देत आहे. अशातचं देशातील महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशभरात कोरोनाच्या बाबतीत महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता राज्यात अनेक कोविड सेंटर उभारली जात आहेत. गेल्या एका आठवड्यात राज्यात 1 लाख 90 हजाराहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत.
याशिवाय संपूर्ण देशात दररोज कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक जलद गतीने वाढत आहे. आता दिवसभरातील कोरोना रुग्ण संख्येचा आकडा 90 हजारांच्या पुढे गेला आहे. भारतात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूच्या 93 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 513 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबरच्या मध्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत आतापर्यंत सर्वाधित वाढ झाल्याचं समोर आलं आहे. कोरोना प्रकरणातील दैनंदिन प्रकरणे शनिवारपेक्षा आजही मोठी आहेत. (वाचा - Covid-19 Vaccination: मुंबईत रविवारीदेखील लसीकरण केंद्र सुरू राहणार; BMS ने ट्विट करत नागरिकांना केलं लस घेण्याचं आवाहन)
महाराष्ट्रातील दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी काही आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे. राज्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तज्ञांनी पुढील 10 उपाय सांगितले आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी 10 उपाय -
- सार्वजनिक बस, लोकल गाड्यांमध्ये किमान प्रवासी संख्या असावी.
- 50 कर्मचार्यांना कार्यालयात काम करण्याची परवानगी देण्यात यावी.
- मॉलमध्ये कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. बाजारपेठेसाठी विषम / सम दिवस लागू केले जावेत.
- रात्री अनावश्यक प्रवासावर बंदी घालावी.
- राज्यभरात 18 आणि त्यापेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जावे.
- लहान कंटेन्ट झोनमध्ये कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे.
- उद्याने आणि समुद्री किनारे यासारख्या सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी कमी करावी.
- विवाहसोहळ्यांमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थित असावी.
- क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन करणार्यांवर आणि मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करत दंड आकारला जावा.
- सार्वजनिक सभेच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांकडून कडक दंड आकारला जावा.
दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारी 49,447 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तसेच 37821 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात एकूण 401172 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 84.49% झाले आहे.