Bacchu Kadu, Nana Patole: बच्चू कडू यांना दुसऱ्यांदा कोरोना संसर्ग; घरातील दोघे COVID 19 पॉझिटीव्ह आल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले क्वारंटाईन
Bacchu Kadu, Nana Patole | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाला आहे. बच्चू कडू यांना कोरोना व्हायरस संसर्ग होण्याची ही दुसरी वेळ आहे. कडू यांना आधीही कोरोना संसर्ग झाला होता. आमदार बच्चू कडू यांनी स्वत:च ही माहिती दिली आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या मुंबईतील घरातील दोघांना कोरोना झाल्याचे समदचे. त्यामुळे नाना पटोले हे सुद्धा क्वारंटाईन झाल्याचे वृत्त प्रसारामाध्यमांनी दिले आहे.

बच्चू कडू यांनी कोरोना संक्रमनाबाबत माहिती देताना सांगितले की, माझी कोरोना चाचणी दुसर्‍यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मुंबईतील घरातील दोघांना कोरना व्हायरस संक्रमन झाल्याचे समजते. त्यामुळे नाना पटोले यांनीही स्वत:ला विलगीकरण कक्षात ठेवले आहे. (हेही वाचा, Coronavirus: राजेश टोपे, जयंत पाटील, रक्षा खडसे कोरोना व्हायरस संक्रमित, राज्यातील COVID 19 रुग्णसंख्याही वाढली)

दरम्यान, राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या वाढताना पाहालया मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच राज्यातील मंत्री आणि राजकीय नेतेही कोरोना संक्रमित झालेल आहेत. आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यात राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनाही कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. त्यामुळे गेल्या काही काळात वाढत असलेली कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या पाहता. सर्वांनीच सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे पुढे आले आहे.