राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या वाढताना पाहालया मिळत आहे. सर्वसामान्य नागरिकांसोबतच राज्यातील मंत्री आणि राजकीय नेतेही कोरोना संक्रमित झालेल आहेत. आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यात राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनाही कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. त्यामुळे गेल्या काही काळात वाढत असलेली कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या पाहता. सर्वांनीच सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे पुढे आले आहे.
राजेश टोपे यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हटले?
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आज तीन ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नागरिकांनी ही बाब गांभिर्याने घेऊन 'एसएमएस' चा (सोशल डिस्टंसिंग,मास्क आणि सॅनिटायजरचा वापर) अवलंब करावा.
अमरावती जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 48 टक्के असून आठवड्याचा 35 टक्के आहे तर यवतमाळ जिल्ह्याचा दैनंदिन आणि आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 15 टक्के आहे.
सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे. एका रुग्णामागे किमान 20 ते 30 निकट सहवासितांची तपासणी करुन चाचण्यांचे प्रमाण वाढवावे आणि पॉझिटिव्हिटी दर 10% पेक्षा खाली आणावा असे निर्देश संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत.
दरम्यान, राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनाही कोरोना व्हायरस संक्रमन झाले आहे. जयंत पाटील यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.