Coronavirus Updets in Maharashtra: कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन महाराष्ट्र सरकार हळूहळू शिथील करत आहे. त्यामुळे राज्यातील दुकाने, कार्यालयं सुरु होत असल्याचे पाहायला मिळते आहे. मात्र, असे असले तरी राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या अद्यापही कमी होतना दिसत नाही. आज दिवसभरात राज्यात 7,760 कोरोना संक्रमित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर रुग्णालयात उपचार घेऊन बरे वाटू लागल्याने आणि प्रकृती सुधारणा झाल्याने 12,326 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, राज्यातील 300 जणांनी कोरोना व्हायरस संसर्गामुळे आज दिवसभरात आपले प्राण गमावले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 4,57,956 इतकी झाली आहे. त्यापैकी 2,99,356 जणांना रुग्णालयात उपचार करुन प्रकृती सुधारल्यावर सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आली आहे. राज्या प्रत्यक्ष रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 1,42,151 इतकी आहे. तर राज्यात आतापर्यंत 16,142 जणांना कोरोना व्हायरस संसर्गामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. (हेही वाचा, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कोरोना विषाणूची लागण)
7,760 #COVID19 cases, 12,326 discharged & 300 deaths reported in Maharashtra today. Total number of cases in the state is now at 4,57,956, including 1,42,151 active cases, 2,99,356 discharged & 16,142 deaths: State health Department pic.twitter.com/HfGadyTGSX
— ANI (@ANI) August 4, 2020
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांच्या आकडेवारीसोबतच देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांच्या आकडेवारीवर नजर टाकता, ती संख्याही मोठी आहे. देशभरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 1855746 इतकी झाली आहे. आतापर्यंत 1230510 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. 38938 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्यास्थिती 586298 जणांवर रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरु आहेत.