केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कोरोना विषाणूची लागण
Union Minister Dharmendra Pradhan (PC - PTI)

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान (Union Minister Dharmendra Pradhan) यांना कोरोना विषाणूची (COVID19) लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांना हरियाणामधील गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची रविवारी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आज धर्मेंद्र प्रधान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या धर्मेंद्र प्रधान आणि अमित शहा यांच्यावर उपचार सुरू आहेत. (हेही वाचा - Coronavirus Update: देशात 24 तासात 52,050 कोरोना रुग्णांची वाढ, 803 मृत्यु; एकुण कोरोनाबाधितांची संख्या 18,55,746 वर)

दरम्यान, मागील 24 तासात देशात 52,050 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख 55 हजार 746 वर पोहचली आहे. तसेच 24 तासात 803 मृत्युंची नोंद झाली. आतापर्यंत राज्यात 38,938 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.