Coronavirus In India: देशात कालच्या दिवसभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संंख्येत मोठी वाढ झाल्याचे समजत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, मागील 24 तासात देशात 52,050 नवे कोरोना रुग्ण आढळुन आल्याने एकुण कोरोनाबाधितांची संख्या ही 18,55,746 वर पोहचली आहे. तसेच 24 तासात 803 मृत्युंची नोंद होऊन देशातील आजवरच्या कोरोना मृतांंचा आकडा 38,938 इतका झाला आहे. सद्य घडीला देशात एकुण 5,86,298 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण असुन त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आजवर 12,30,510 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा रेट हा आता 65 टक्क्यांवर पोहचला असुन कोरोना रुग्ण वाढ, मृत्यु आणि बरे होण्याचे प्रमाण यांची सरासरी काढल्यास परिस्थिती सुधारणेच्या मार्गावर आहे असे दिसत आहे. Unlock 3.0 Guidelines: केंद्र सरकारने जाहीर केली अनलॉक 3 ची मार्गदर्शक तत्त्वे
देशात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण सुद्धा वाढवण्यात आले आहे. कालच्या दिवसभरात झालेल्या 6,61,182 कोरोना चाचण्यांसह आतापर्यंत देशात 2,08,64,750 स्वॅब टेस्ट घेण्याट आल्या आहेत. यासंदर्भात आयसीएमआर तर्फे माहिती देण्यात आली आहे.
ANI ट्विट
Single-day spike of 52,050 positive cases & 803 deaths in India in the last 24 hours.
India's #COVID19 tally rises to 18,55,746 including 586298 active cases, 1230510 cured/discharged/migrated & 38938 deaths: Health Ministry pic.twitter.com/HVt5wRKeFy
— ANI (@ANI) August 4, 2020
देशात 24 तासात 52,050 Corona रुग्णांची वाढ, 803 मृत्यु; एकुण कोरोनाबाधितांची संख्या 18,55,746 वर : Watch Video
दरम्यान, 5 ऑगस्टपासून भारतामध्ये अनलॉक 3 सुरू होणार आहे. यावेळेस देशात जीम आणि योगा सेंटर यांना परवानगी देण्यात आली आहे. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत सर्व कंटेनमेंट झोनमध्ये कडक लॉकडाऊन राहील. 5 ऑगस्ट 2020 पासून रात्र कर्फ्यू असणार नाही अशीही माहिती केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीत देण्यात आली आहे.