Maharashtra minister Uday Samant (PC - ANI)

कोरोना व्हायरमुळे (Coronavirus) जभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हजारोंच्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाकडून कोरोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तर काही देशांनी त्यांच्या सीमारेषा बंद केल्याने उड्डाणे ही रद्द केली आहेत. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणासाठी परदेशात गेलेल्या नागरिक अडकून पडले असून त्यांना मायदेशी जाण्याची ओढ लागली आहे. तर परदेशात बहुसंख्येने भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी सुद्धा गेले होते त्यामधील काही जणांना भारतात आणण्यात आले आहे. तर युरोपातील (Europe)  रिगा विमानतळावर अडकलेल्या भारतीय 37 विद्यार्थ्यांना आता मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ट्वीट करत परदेशात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मयादेशी आणण्यासाठी केंद्र सरकारसोबत संपर्क करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तर एकूण 37 विद्यार्थी हे युरोपातील लॅटव्हियाची राजधानी रिगा येथील विमानतळावर अडकले आहेत. या 37 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थी हे महाराष्ट्रातील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात 12 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने एकूण संख्या 147 वर पोहचली आहे. याबाबतची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.(Coronavirus: रेल्वेमध्ये तयार होणार कोरोना ग्रस्तांसाठी हॉस्पिटल; एसी कोच आयसोलेशन वॉर्डमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना कोरोना व्हायरस पासून स्वतःला वाचवायचं असेल तर घरीच रहा. कोरोनाशी सामना करायला सरकार सज्ज आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी करून सरकारी यंत्रणेवरील ताण वाढवू नये असे आवाहन केलं आहे. देशावर आलेल्या महासंकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी सरकारचे नियम पाळावेत असे ही सांगण्यात येत आहे. नागरिकांना लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवासुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.