आता कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धच्या या लढाईमध्ये मदतीसाठी भारतीय रेल्वे (Indian Railway) देखील पुढे आली आहे. या साथीच्या आजाराला सामोरे जाण्यासाठी रेल्वेने एसी कोच आयसोलेशन वॉर्डमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. भोपाळ रेल्वे विभागात उपलब्ध असणारे 60 एसी कोचचा वापर करून, प्रत्येक कोचमध्ये संसर्ग झालेल्या सहा कोरोनो रुग्णांची वेगळी राहण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. अशा प्रकारे या कोचमध्ये 360 लोकांना वेगळे ठेवण्यात येणार आहे. यासोबतच रेल्वेने कोच कारखान्यांमध्ये मास्क आणि सॅनिटायझर बनविण्याच्या सूचना दिल्या आहेत, देशात आवश्यक वैद्यकीय उपकरणांची कमतरता भासू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.
उत्तर मध्य रेल्वेचे (NCR) महाव्यवस्थापक राजीव चौधरी म्हणाले की, आरोग्य कर्मचार्यांशी सल्लामसलत केल्यानंतर, रेल्वे नवी दिल्लीतील कोचिंग डेपोमध्ये उपलब्ध असलेल्या डब्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोरोना ग्रस्त रूग्णांसाठी ट्रेनचे स्लीपर कोच आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतरित केले जातील. रेल्वेची ही योजना आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यास मदत करेल. त्याचप्रमाणे भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) आवश्यकतेनुसार देशाच्या विविध भागात आणि रुग्णालयात अन्न पुरविण्याच्या योजनेवर काम करीत आहे. (हेही वाचा: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार: नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने दिल्या सुचना)
एका कोचमध्ये चार शौचालये असतात, त्यामुळे तेथे 2 ते 4 आयसोलेशन वार्ड बांधले जाऊ शकतात. या पार्श्वभूमीवर एनसीआरने मालगाड्यांमध्ये ऑपरेशनल सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. सध्या रेल्वे विभागाचे विविध डेपो आणि यार्डांमध्ये सॅनिटायझ केलेले डबे आहेत. आदेश मिळाल्यानंतर त्यांचा वापर करता येईल. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या सूचनेनंतर भोपाळसह स्थायी गाड्यांच्या एसी कोचमध्ये कोरोना बाधित व्यक्तींसाठी व्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.