प्रतीकात्मक फोटो | (Photo Credits: File Image)

महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुणे शहरात आढळून आले आहे. मात्र, आता औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. औरंगाबाद येथे आज आणखी 30 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 308 वर पोहचली आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, नागरिकांनी स्वताची काळजी घेणे गरजेचे आहे.

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी राज्य सरकाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना विरोधात लढा देत आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोराना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील नागरिकांच्या मनात भिती पसरली आहे. ज्या प्रकारे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांना तात्पुरता सुटकेचा श्वास घेतला आहे. हे देखील वाचा- Coronavirus: अहमदनगर मध्ये मुंबईहून आलेल्या 3 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 75 वर पोहोचली

ट्वीट-

महाराष्ट्र विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात आहे. मात्र, काही परिसरात नागरिक लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून अशा नागरिकांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे.