Coronavirus in Maharashtra | (Photo credit: archived, edited, symbolic images)

राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांच्य संख्येने आज (6 ऑगस्ट) आजवरचे सर्वोच्च टोक गाठले. त्यामुळे धोका अधिक गडद झाला आहे. राज्यात आज दिवसभरात तब्बल 23,350 इतक्या कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद (Coronavirus Cases In Maharashtra) झाली. आज नोंदला गेलेला आकडा आहा राज्यातील कोरोना रुग्णांचा आतापर्यंतचा सर्वोच्च आकडा आहे. महाराष्ट्र अनलॉक 4 (Maharashtra Unlock 4) आता वेगाने कार्यरत आहे. त्यामुळे अपावाद वगळता सर्व दुकाने, सेवा, जनजीन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र असतानाच कोरोना व्हायरस संकट पुन्हा एकदा उग्र रुप धारण करताना दिसत आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात 23,350 नव्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची नोंद झाली. तसेच 328 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच वेळी नोंदल्या गेलेल्या एवढ्या मोठ्या संख्येमुळे राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या आता 9,07,212 इतकी झाली आहे. यात उपचार घेऊन आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या 6,44,400 जणांचा आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 26604 जणांचाही समावेश आहे. तसेच, एकूण संख्येत ( 9,07,212) राज्यात विद्यमान स्थिती प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या 2,35,857 रुग्णांचाही समावेश आहे. (हेही वाचा, मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 6 रुग्ण आढळल्यानंतर आकडा 2819 वर पोहचला; BMC ची माहिती)

दरम्यान, संपूर्ण राज्यासह राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरातही कोरोना व्हायरस संकटाचे प्रमाण नियंत्रणात कायम आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहरात आज दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 1,910 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 37 जणांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात मुंबई शहरात उपचार घेऊन बरे झालेल्या 911 जणांना रुग्णालयातून सुट्टी (डिस्चार्ज) देण्यात आली.

मुंबई शहारातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 1,55,622 इतकी झाली आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या 23,930, डिस्चार्ज मिळालेल्या 1,23,478 आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 7,866 जणांचाही समावेश आहे.