Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत आहेत. याच दरम्यान आता मुंबईतील धारावीत कोरोनाचे आणखी 6 रुग्ण आढळले असल्याने आकडा 2819 वर पोहचल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. त्यापैकी 97 हे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 2452 जणांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीतील कोरोनाच्या परिस्थितीवर मिळवण्यात आलेल्या नियंत्रणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले होते.(Coronavirus Outbreak: महाराष्ट्रात तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती गेले कोरोनाचे बळी; जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी)

कोरोनासंक्रमितांची गैरसोय होऊ नये म्हणून सुद्धा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांची बिलाच्या रक्कमेतून लूट केली जात असल्याच्या खुप तक्रारी समोर आल्या आहेत. याच दरम्यान आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयांच्या बिलांचे पूर्व ऑडिट केले पाहिजे आणि त्या संदर्भातील विशेष सुचना सुद्धा रुग्णालयांना दिल्या आहेत.(महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत ठरवलेल्या रक्कमेपेक्षा बिलाचे अधिक पैसे उकळल्यास सदर व्यक्तीला 5 पट दंड किंवा शिक्षा केली जाणार- राजेश टोपे)

दरम्यान, राज्यातील मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे आणि औरंगाबागद येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. परंतु कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने अनलॉक-4 नुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार आता  ई-पासची गरज नसणार असून नागरिकांना विविध राज्याअंतर्गत प्रवासासाठी परवानगी दिली आहे. तर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण कसे मिळवावे या संबंधित एक बैठक पार पडली आहे.