Coronavirus Outbreak: महाराष्ट्रात तुम्ही राहत असलेल्या जिल्ह्यात किती गेले कोरोनाचे बळी; जाणून घ्या जिल्हानिहाय आकडेवारी
Coronavirus | (Photo Credits: Pixabay.com)

Coronavirus Update In Maharashtra: महाराष्ट्र आरोग्य मंत्रालयाने (Maharashtra Health Department) दिलेल्या ताज्या अपड्टेसनुसार, राज्यात काल (5 सप्टेंबर) दिवसभरात कोरोनाचे 20,489 नवे रुग्ण आढळले असून 312 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे महाराष्ट्रात एकूण कोरोना बाधितांचा आकडा 8 लाख 83 हजार 862 वर (Coronavirus Cases) पोहोचला असून मृतांचा आकडा 26,276 वर (Coronavirus Death Cases) पोहोचला आहे. राज्यात सद्य घडीला 2,20,661 रुग्ण कोरोनावर (COVID 19 Active Cases) उपचार घेत आहेत. तर काल दिवसभरात राज्यात 10,801 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 6,36,574 कोरोनावर यशस्वीरित्या मात (COVID-19 Active Cases) केली आहे.

राज्यात सद्य घडीला सर्वाधिक रुग्ण संख्या मुंबईत (Mumbai) नसून पुणे (Pune) जिल्ह्यात असल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरुन कळत आहे. पुण्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,94,559 असून 4377 रुग्ण दगावले आहेत. तर मुंबईत कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1,53,712 असून मृतांची एकूण संख्या 7832 वर पोहोचली आहे. Coronavirus Update: मुंंबईत आज कोरोनाचे 1735 रुग्ण वाढले, 33 मृत्यु, एकुण कोरोनाबाधितांंची आकडेवारी इथे पाहा

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी (5 सप्टेंबर रात्री 8: 00 वाजेपर्यंत)

जिल्हा उपचार सुरू मृत्यू बरे झालेले रुग्ण संक्रमित रुग्ण
अहमदनगर 5522 346 18143 24011
अकोला 965 164 3194 4324
अमरावती 1209 140 4397 5746
औरंगाबाद 5414 692 18500 24606
बीड 1425 141 3863 5429
भंडारा 735 27 792 1554
बुलढाणा 1226 84 2651 3961
चंद्रपूर 2069 23 1491 3583
धुळे 2257 229 6694 9182
गडचिरोली 246 1 672 919
गोंदिया 1013 22 1098 2133
हिंगोली 296 41 1374 1711
जळगाव 7705 915 22110 30730
जालना 1499 147 3277 4923
कोल्हापूर 6608 770 17870 25248
लातूर 3524 304 5854 9682
मुंबई 22978 7832 122566 153712
नागपूर 16557 878 18804 36243
नांदेड 4371 250 4278 8899
नंदुरबार 1285 83 1801 3169
नाशिक 9275 953 33956 44184
उस्मानाबाद 2383 198 4509 7090
इतर राज्ये 761 80 0 841
पालघर 5701 632 21314 27647
परभणी 1270 96 1836 3202
पुणे 57771 4377 132411 194559
रायगड 7473 825 25742 34042
रत्नागिरी 2062 162 2605 4829
सांगली 7576 519 9541 17636
सातारा 6845 413 10471 17731
सिंधुदुर्ग 880 24 751 1655
सोलापूर 5750 826 15601 22178
ठाणे 23270 3935 113785 140991
वर्धा 652 22 755 1430
वाशिम 553 33 1490 2077
यवतमाळ 1535 92 2378 4005
एकूण 220661 26276 636574 883862

प्राप्त माहितीनुसार, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 72.01% एवढे झाले आहे तर सध्या राज्यातील मृत्यूदर 2.97% एवढा आहे. राज्यात आजपर्यंत 45,56,707 चाचण्या पार पडल्या आहेत. सध्या राज्यात 14,81,909 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत तर 37,196 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.