Coronavirus Update: मुंंबईत आज कोरोनाचे 1735 रुग्ण वाढले, 33 मृत्यु, एकुण कोरोनाबाधितांंची आकडेवारी इथे पाहा
Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

Coronavirus Update In Mumbai: मुंंबई मध्ये आज कोरोनाचे 1735 रुग्ण सापडले आहेत, ज्यानुसार एकुण कोरोनाबाधितांंची संख्या 1,53,712 वर पोहचली आहे. मागील 24 तासात मुंंबई मध्ये 33 रुग्णांंचा कोरोनाने मृत्यु (Coronavirus Deaths) झाला आहे ज्यामुळे एकुण कोरोनाबाधित मृतांंचा आकडा 7829 वर पोहचला आहे. आजच्या दिवसात 896 जणांंनी कोरोनावर मात केली असुन एकुण 1,25,567 जण आजवर कोरोनामुक्त (Coronavirus Recovery) झाले आहेत. राज्यात एकुण एकूण सक्रिय रुग्ण (COVID 19 Active Cases)  22,975 आहेत. सध्या मुंंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर 80% इतका आहे. यासंदर्भात मुंंबई महापालिकेकडुन (BMC) सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

मुंंबई मध्ये कोरोना रुग्ण वाढीमागे वेगाने होणार्‍या चाचण्यांंचे कारण दिले जाते तर या चाचण्यांंची आकडेवारी पाहिल्यास आजवर मुंंबईत 8 लाख 13 हजार 035 चाचण्या झाल्या आहेत. Coronavirus Update: महाराष्ट्रात आज 20,489 नवे कोरोना रुग्ण, 312 मृत्यु, 10,801 जणांंना डिस्चार्ज, जाणुन घ्या एकुण रुग्णसंख्या

BMC ट्विट

दरम्यान, मुंंबई मध्ये 551 कंटेनमेंट झोन आहेत, 6 हजार 797 इमारती या सील करण्यात आल्या आहेत. मुंंबईत कोरोना दुप्पटीचा रेट हा सुद्धा आता वाढुन 73 दिवसांंवर पोहचला आहे. ही एकुणच आकडेवारी पाहता सध्या मुंंबईमधील परिस्थिती गंंभीर असुनही नियंंत्रणात आहे असे म्हणता येईल.