कोरोना व्हायरस (Coronavirus) लॉकडाऊन (Lockdown) काळात भारतीय दंड संहीता कलम 188 अन्वये राज्यभरात 1,07,256 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर कायदा मोडणाऱ्यां नागरिक आणि गुन्हेगारांकडून या काळात 4,10,79,494 रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी दिली आहे. लॉकडाऊन काळात महाराष्ट्र पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या 2018 घटना घडल्या आहेत. या प्रकरणी 770 जणांना अटक करण्यात आली आहे. तर आतापर्यंत राज्यभरात 3,31,151 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यापैकी 672 जणांनी क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केल्याचे पुढे आले आहे, अशी माहितीही अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सरकार राज्यभरात 3,932 मदत केंद्रं चालवत आहे. या केंद्रांमधून सुमारे 3,74,456 स्थलांतरीत कामगारांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात येत असल्याचेही गृहमंत्री देशमुख यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Coronavirus: पुणे येथे 24 वर्षीय कोरोना संशयिताची आत्महत्या; एका खासगी रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन)
गृहमंत्री देशमुख ट्विट
As many as 1,07,256 offences regd. u/s 188 of IPC since the lockdown leading to 20,237 arrests & seizure of 57,670 vehicles.
₹4,10,79,494 have been collected in fines from offenders.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 15, 2020
गृहमंत्री देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात अवैध वाहतूक केलेप्रकरणी 1,304 गुन्हे दाखल झाले आहेत. तर 1,153 पोलीस कर्मचाऱ्यांची कोरोना व्हायवरस चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमित 9 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.