Cooper Hospital Health Workers (Photo Credits: Twitter/ANI)

गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रातील जनता ज्या लसीची आतुरतेने वाट पाहत होती ती कोरोनाची लस (COVID-19 Vaccine) अखेर महाराष्ट्रात दाखल झाली आहे. आज राज्यातील अनेक जिल्ह्यांत ही लस पोहोचली असून याच्या पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचा-यांना हे लस दिली जाणार आहे. आज मुंबईतील (Mumbai) कूपर रुग्णालयात (Cooper Hospital) ही लस दाखल झाली. त्यासोबत ही लस देणारे अनेक प्रशिक्षित तज्ज्ञही सोबत होते. त्यामुळे जेव्हा ही लस कूपर रुग्णालयात आली तेव्हा रुग्णालयाती कर्मचा-यांनी टाळ्यांच्या गजरात या लसीचे स्वागत केले.

या रुग्णालयातील परिसरात रुग्णालयातील डॉक्टर्स तसेच अन्य कर्मचारी उभे होते. या सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या कोरोना लसीचे स्वागत केले. पाहा ANI चा हा खास व्हिडिओ

हेदेखील वाचा- Corona Vaccination in Maharashtra: महाराष्ट्रात आजपासून कोरोना लसीकरण प्रारंभ, 285 केंद्रांवर यंत्रणा सज्ज

कोरोना लस देण्यात येणाऱ्या व्यक्तींना शुक्रवारी (15 जानेवारी 2021) सायंकाळ पर्यंत मेसेज पाठविण्याचे काम सुरु होते. ज्या व्यक्तींना मेसेज प्राप्त झाले आहेत त्यांनाच कोरोना लस घेता येणार आहे. या मेसेजमध्ये संबंधित व्यक्तीला कोणत्या केंद्रावर किती वाजता आणि कोणत्या कंपनीची लस दिली जाणार आहे याची नेमकी माहिती देण्यात आली आहे.

कोरोना व्हायरस लसीकरण (Corona Vaccination) मोहिमेस राज्यात आजपासून (शनिवार, 16 जानेवारी 2021) सुरुवात (Corona Vaccination Begining in Maharashtra) होत आहे. या लसीकरणासाठी राज्यभरात सुमारे 285 केंद्रे उभारण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांवरील तयारीही पूर्ण झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक राज्यव्यापी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी 11.30 वाजता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड सुविधा केंद्रामध्ये होणार आहे.