Pune Crime: भाईगिरीवरून वाद, मारमारीत एकाने कानाचा लचकाच तोडला,पुण्यात खळबळ
Crime (PC- File Image)

Pune Crime: पुण्यात एका क्षुल्लक कारणावरून वाद झाला आणि हा एका टोकाला जात एकाने कानाचा लचका तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे. भाईगिरिच्या वादातून हा वाद झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे ( हेही वाचा- क्षुल्लक कारणावरून वाद, मैत्रिणीची हत्या, आरोपीला सहा तासांत अटक)

नेमक काय प्रकरण? 

स्वारगेट परिसरात असलेल्या मार्केट यार्ड रोडवर ही घटना घडली. तीन मित्र गप्पा करत होते. गप्पा मारत एकाने मी मोठा भाई असल्याचं सांगितलं यावरून दुसऱ्या मित्राला राग आला आणि त्याने तू खूप मोठा भाई झालास का? असा प्रश्न विचारला. हे सगंळ प्रकरण सुरु असताना दुसऱ्यांने रागाच्या भरात रागाच्या हल्ला करत कानाचा लचकाच तोडला, घटनेनंतर डोक्याला दगडाने मारहाण केली आणि एवढेंच नव्हे तर आरोपीने दारूची फुटलेली बाटली येऊन पीडित तरुणाच्या मागे लागला. पीडितेने कसाबास जीव वाचवत घटनास्थळावरून पळ काढला.

त्यानंतर पीडित थेट पोलिस ठाण्यात गेला आणि आरोपी सौरभ नितीन आदमाने पवन काळे या दोघांच्या विरोधात तक्रार केली. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. हर्ष कैलास कांबळे (वय २०) असं पीडितेचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर पीडित हर्ष याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे.