Mumbai Crime: क्षुल्लक कारणावरून वाद, मैत्रिणीची हत्या, आरोपीला सहा तासांत अटक
Murder | Representational image (Photo Credits: pixabay)

Mumbai Crime: मुंबई येथील जीटीबी नगर रेल्वे स्थानकावर एका महिलेचा मृतदेह  (Deathbody) सापडल्याने खळबळ उडाली. दरम्यान पोलिसांनी अवघ्या सहा तासांत या हत्येचा उलगडा केला आहे. आरोपीविरुध्दात बुधवारी एफआयआर नोंदवले. आरोपी हा मृत तरुणीचा मित्र असल्याचे समोर आले आहे. अनुमुन्नी (वय वर्ष ४०) असं मृत तरुणीची ओळख झाली आहे. पोलिसांनी ओळख पटवून कुटुंबियांना माहिती दिली.( हेही वाचा- गुंतवलेले पैसे परत मिळविण्यासाठी सीएचे अपहरण, चौघांना अटक)

मिळालेल्या माहितीनुसार, अनुमुन्नी ही अॅंटॉप हिल येथील रहिवासी होती. आरोपी मफिझुल खान (वय वर्ष २४) हा व्यसनी होता. आरोपीसोबत महिले देखील व्यसनी होती. दररोज ड्रग्ज घेत असल्याचे समोर आले. पोलिस आरोपीचा शोध घेत गोवंडी येथे पोहचले. गेल्या काही दिवसांपूर्वी अनुमुन्नीला आरोपी मित्राने पाच हजार रुपयांचा मोबाईल घेऊन दिला. तो या गोष्टीची आठडन करुन देत असे परंतु पीडितेने या कडे दुर्लक्ष केले. याचा रागत मनात धरात आरोपीने महिलेची हत्या केली.

आरोपीने महिलेला ड्रग्जचा ओव्हर डोस दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. महिलेचा मृतदेह आरोपीने रेल्वे स्थानकावर फेकला होता. महिलेचा मृतदेह जीटीबी नगर येथे सापडला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. अहवालानुसार महिलेचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हर डोस मुळे झाल्याचे समोर आले आहे.  पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करत अटक केले आहे.