Kidnaping | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पवई येथून चार्टर्ड अकाउंटंट (Chartered Accountant) भूषण अरोरा यांच्या अपहरणात (Kidnap) सहभागी असलेल्या चार जणांना अटक केली आहे. अरोरा यांच्या डिव्हाईन पॉवर या कंपनीत गुंतवलेले पैसे परत मिळवण्यासाठी आरोपींनी त्यांचे अपहरण केल्याची माहिती आहे. आरोपींनी अरोरा यांच्या कुटुंबीयांकडे 5 कोटी रुपयांची खंडणीची मागतली होती. प्राप्त माहितीनुसार, पवई येथे राहणारे सीए भूषण अरोरा हे 18 जानेवारी रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार पवई पोलिसांना (Powai Police) प्राप्त झाली होती. ही तक्रार अरोरा यांच्या पत्नी मेधा यांनी दिली होती. ज्यात म्हटले होते की, आपले पती म्हणजेच भूषण 17 जानेवारी रोजी ऑफिसला गेल्यानंतर घरी परतलेच नाहीत. दरम्यान, अरोरा यांच्या सुरक्षित सुटकेसाठी 5 कोटी रुपयांची मागणी करणारा खंडणीचा फोन आल्यावर परिस्थिती आणखीनच गंभीर बनली. अरोरा यांच्यासोबत काहीतरी चुकीचे घडत असल्याचे निष्पन्न झाले.

अरोरा यांच्या आर्थिक अडचणी:

अरोरा यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, त्यांनी डिव्हाईन पॉवर या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून नातेवाईक आणि मित्रांकडून शेअर बाजारात लक्षणीय रक्कम गुंतवली होती. तथापि, शेअर बाजार गडगडल्यामुळे तोटा सहन करावा लागल्याने अरोरा गुंतवलेले पैसे परत करू शकले नाहीत. नाराज गुंतवणूकदारांनी पैशांची मागणी सुरु झाली. मात्र, कोणताही परतावा मिळत नाही हे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी त्यांना धमक्या दिल्या, त्यामुळे अरोरा यांच्यासाठी आर्थिक संकट निर्माण झाले. (हेही वाचा, Own Kidnapping Case: वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट, वसई येथील धक्कादायक प्रकार)

पोलीस कारवाई आणि बचाव:

खंडणीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी नवी मुंबई येथील पनवेल परिसरात आहेत. अपहरण केल्यानंतर त्यांनी पनवेल तालुक्यातीलच एका फार्महाऊसमध्ये अरोरा यांना ठेवले आहे. पोलिसांनी प्राप्त माहितीनुसार कामोटे येथे सापळा रचला. दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि अरोरा यांची सुटका करण्यात आली आणि त्यांचा भेट कुटुंबियांशी घालून दिली. (हेही वाचा, चंद्रपूर मध्ये शाळेला दांडी मारल्याने पालक रागावू नये म्हणून 10 वर्षीय मुलाने रचला अपहरणाचा बनाव; क्राईम शो मधून कल्पना)

तपास आणि अटक:

पोलिसांनी केलेल्या तपासात आढळून आले की, आरोपींनी त्यांची गमावलेली गुंतवणूक परत मिळवण्याच्या उद्देशाने अरोरा यांचे अपहरण केले. अमोल म्हात्रे (49), निरंजन सिंग (32), विधिचंद्र यादव (31) आणि मोहमंद सुलेमान उर्फ सलमान शेख (20) अशी अटक केलेल्या चार जणांची नावे आहेत. (हेही वाचा, Kerala Kidnapped Girl Rescued Video: अपहरण झालेल्या मुलीचा अखेर २४ तासानंतर लागला शोध, केरळ येथील घटना)

पोलिसांनी घटनांचे गांभीर्य ओळखून तातडीने पावले उचलल्याने संभाव्य धोका टळला. सीए असलेल्या अरोरा यांचे प्राण वाचू शकले. पोलिसांना पोहोचण्यास किंवा माहिती मिळण्यास विलंब झाला असता तर कदाचित अरोरा यांच्यासोबत आरपींकडून काहीतरी बरेवाईट केले जाण्याची शक्यता होती. केवळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे आमचा माणूस आम्हाला सुस्थितीत भेटू शकला, अशी भावना अरोरा कुटुंबीयांनी या संपूर्ण प्रकरणावर व्यक्त केली आहे.