प्रेमाचे खोटे आमिष दाखवून शारिरिक संबंधासाठी महिलेची सहमती मिळवणे हा सुद्धा बलात्कारच आहे, असा निकाल एका प्रकरणाच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका जोडप्याचे एकमेकांवर प्रेम होते. दरम्यान, त्यांच्यात शारिरिक संबंधही प्रस्तापित केले होते. परंतु, याप्रकरणातील आरोपीने काही काळाने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी पिडिताने आरोपीच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. एकमेकांच्या सहमतीने पीडितेसोबत शारिरिक संबंध प्रस्तापित केले होते, असे सांगत बलात्कारच्या आरोपातून मुक्तता करण्याच यावी, अशी याचिका आरोपीने उच्च न्यायालयात दाखल केली होती. न्या. सुनील शुकरे आणि न्या. माधव जमादार यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळण्यात आली असून महिलेच्या बाजूने निकाल दिला आहे. पुरुषाने दिलेले आश्वासन स्त्रीला चुकीचा अर्थ सांगण्यासाठी पुरेशी होती. त्यामुळे याचिका कोणत्याही गुणवत्तेविना आहे. तसेच ती फेटाळण्यास पात्र आहे, असेही न्यायालयाने सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलाच्या सहमतीने शारिरिक संबध निर्माण केले होते. त्यावेळी दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याचा कारणावरून महिलेने शारिरिक संबंध ठेवण्यास होकार दिला होता. परंतु, लग्नाआधी शारिरिक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. मात्र, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तुझ्याशिवाय माझे कोण नाही, असे खोटे आश्वासन देत आरोपीने पीडितेसोबत शरिरिक संबंध प्रस्तापित केले होते. परंतु, काही दिवसानंतर आरोपीने पीडितेसोबत असलेले प्रेमसंबंध पुढे ठेवण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपीने आपली फसवणूक केल्याचे पीडिताच्या लक्षात आले. त्यानंतर पीडिताने आरोपीच्याविरोधात पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल केला. यावर आरोपीने पिडितेसोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरुन महिलेच्या सहमतीने शारीरिक संबंध प्रस्तापित केल्याचे याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणाचा आज उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. प्रेमाचे आमिष दाखवून संमतीने शारीरिक संबंध प्रस्तापित करणे यामध्ये पिडितेची सहमती असल्याचे सिद्ध होत नाही. अशाप्रकारचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणे बलात्काराच मानले जाईल, असा निकाल एका प्रकरणाच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. हे देखील वाचा- अकोला: एका बेपत्ता मुलीचा शोध घेण्यात निष्काळजीपणा दाखवणाऱ्या 2 पोलिसाचे निलंबन
या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्यांने प्रेमाचे आमिष दाखवून शारिरिक संबंधासाठी पीडितेची सहमती प्राप्त केली आहे. जरी पुरुषाने लग्नाबद्दल पिडितेला कोणतेही वचन दिले नाही. दरम्यान, पुरुषाने तुझ्यावरच माझे जीवापाड प्रेम असून तुझ्या व्यतरिक्त माझे कोणावरही प्रेम नाही, असे सांगत तिची सहमती मिळवली होती. पुरुषाने दिलेले आश्वासन स्त्रीला चुकीचा अर्थ सांगण्यासाठी पुरेशी होती. त्यामुळे याचिका कोणत्याही गुणवत्तेविना आहे आणि ती फेटाळण्यास पात्र आहे, "असे न्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान सांगितले आहे.