Palghar ZP Election: पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या 27 जागांवर काँग्रेस स्वबळावर लढणार
(Photo Credit: PTI)

पालघर जिल्हापरिषदेमधील (Palghar ZP Election) रिक्त झालेल्या जागांवर 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या सत्तेत एकत्र असलेल्या महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) काँग्रेसने (congress) या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देऊन निवडणुकीचे बिगुल वाजविले आहे. या पोट निवडणुकीत काँग्रेस इतर पक्षाशी हातमिळवणी न काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे काँग्रेसचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व माजी खासदार हुसेन दलवाई (Hussain Dalwai) यांनी म्हटले आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील बहुतांश जागावर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

पालघर जिल्हा परिषद निवडणुकींच्या तोंडावर हुसेन दलवाई आणि काँग्रसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत बैठक पार पडली. त्यानंतर हुसेन दलवाई यांनी प्रसारमाध्यामांशी संवाद साधला. स्थानिक स्तरावर निवडणुकांमध्ये इतर पक्षांशी हातमिळवणी केल्यास इतर पक्ष मते फिरवण्याची दाट शक्यता आहे. हे लक्षात घेता काँग्रेस पालघरमध्ये एकला चालो रे च्या भूमिकेत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच येत्या 29 तारखेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पालघर दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हे देखील वाचा- Maharashtra Police :परमबीर सिंह यांच्यासह 25 पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

राज्यातील 6 जिल्हापरिषद आणि पंच्यायत समित्यांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणावरून रखडल्या होत्या. या निवडणुका येत्या 5 ऑक्टोबर रोजी घेण्याचे राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. तसेच निवडणुंकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, पालघर जिल्हा परिषदेच्या 15 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.