Maharashtra Vidhan Sabha Election 2024: निवडणूकाच्या रिंगणात उतरलेल्या सर्वच पक्ष आणि उमेदवारांनी कंबर कसली आहे. राजकारणात कोणीच कोणाचे सख्खे नसते असे म्हणतात. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करताना पक्ष मागेपुढे पाहत नाही. काँग्रेसमध्ये सध्या बंडाळीपहायला मिळत आहे. महाराष्ट्र काँग्रेसने (Congress) रविवारी 7 बंडखोर उमेदवारांना पक्षविरोधी कारवायांसाठी सहा वर्षांसाठी निलंबित केले. विविध विधानसभा मतदारसंघातून(Maharashtra Vidhan Sabha Election 2024)हे उमेदवार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.
या नेत्यांवर केली कारवाई
कारवाईला सामोरे गेलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये शामकांत सनेर, राजेंद्र ठाकूर, आबा बागुल, मनीष आनंद, सुरेश कुमार जेथलिया, कल्याण बोराडे आणि चंद्रपॉल चौकसे यांचा समावेश आहे. त्याशिवाय, आदल्या दिवशी देखील काँग्रेसने काही कार्यकर्त्यांवर निलंबणाची कारवाई केली होती. यात रामटेक मतदारसंघातील माजी मंत्री राजेंद्र मुळक , काटोल येथील याज्ञवल्क जिचकार, कसबा येथील कमल व्यवहारे, कोपरी-पाचखडी मतदार संघातील मनोज शिंदे आणि आबा बागुल यांचा समावेश आहे.
एआयसीसीचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आल्याचे काँग्रेसच्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळा आत्तापर्यंत 22 मतदारसंघात एकूण निलंबनाची संख्या 28 झाली आहे.
यापूर्वी निलंबित करण्यात आलेल्या नेत्यांच्या यादीत आनंदराव गेडाम, शिलू चिमुरकर, सोनल कोवे, भरत येरमे, अभिलाषा गावतुरे, प्रेमसागर गणवीर, अजय लांजेवार, विलास पाटील, अस्मा जावद चिखलेकर, हंसकुमार पांडे, कमल व्यवहारे, मोहनराव मंगळवेढा, भुजबळ दांडे, कमल व्यवहारे यांचा समावेश आहे. शिंदे, सुरेश पाटीलखेडे, विजय खडसे, शब्बीर खान, अविनाश लाड यागवाल्या जिचकार, राजू झोडे, राजेंद्र मुख यांचा समावेश आहे.
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 जागा जिंकल्या, शिवसेनेला 56 आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. 2014 मध्ये भाजपने 122, शिवसेनेला 63 आणि काँग्रेसला 42 जागा मिळाल्या होत्या.
काँग्रेसने आधीच दिला होता इशारा
हे सर्व निलंबित उमेदवार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवत होते. यापूर्वी, काँग्रेस नेते रमेश चेन्निथ यांना अधिकृत महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरुद्ध लढण्यामुळे सहा वर्षांच्या निलंबनाला सामोरे जावे लागेल. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला होणार असून, 23 नोव्हेंबरला सर्व 288 मतदारसंघांसाठी मतमोजणी होणार आहे.