उत्तर प्रदेशातील अयोध्येमधील राम मंदिराच्या भूमिपूजनावरून महाराष्ट्राचे राजकारणाने चांगलाच पेट घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दीक चकमक सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते मंदिराचे भूमिपूजन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पार पडणार आहे. या मुद्यावरून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी भाष्य केले होते. या वादविवादात काँग्रेस (Congress) पक्षानेही यात उडी घेत केंद्र सरकारवर (Central Government) टीका केली आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला अपयश आले असून, त्यावरून जनतेच लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी राम मंदिराच्या भुमिपूजनावरून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहेत. ”श्रीराम दैवत आहेत. पण रामाचे दर्शन घ्यायला आपण जगले पाहिजे. आपण जगलो तरच रामाचे दर्शन घ्यायला जाऊ. त्यामुळे केंद्र सरकारने आता माणसे जगवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. मात्र, केंद्र सरकारने करोनाच्या काळात सरकारच्या अपयशावरून दुर्लक्ष करण्यासाठी हा राम मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम आयोजित केला आहे,” असे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Ayodhya Ram Mandir: 'राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही' राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला
दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असून यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निमंत्रण दिले आहे का? या प्रश्नावर बोलताना शिवसेना संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही. ते जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हाही गेले होते आणि झाल्यावरही गेले. उद्धव ठाकरे हे नेहमी अयोध्येला जातात. अयोध्येचा रस्ताच शिवसेनेने तयार केला आहे. अयोध्येच्या रस्त्यावरील अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत, ते राजकारण म्हणून नाही. अयोध्या आणि शिवसेनेचे नाते कायम आहे. राजकारण म्हणून नाही तर श्रद्धा आणि हिंदुत्त्व या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान दिले आणि ते कायम राहील, असे संजय राऊत म्हणाले आहेत.