Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने रविवारी आपली चौथी यादी जाहीर केली. या यादीसह, काँग्रेसने आतापर्यंत 101 उमेदवार जाहीर केले आहेत जे 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 288 सदस्यांच्या विधानसभा निवडणुका लढवणार आहेत. याआधी शनिवारी पक्षाने तिसऱ्या यादीत 16 उमेदवारांची घोषणा केली होती, त्यात ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांच्या नावाचा समावेश होता. काँग्रेसने चौथ्या यादीत अनेक नवे चेहरे उतरवले आहेत.
पक्षाने मधुकर किष्णराव देशमुख यांच्या जागी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून लहू शिवले यांना उमेदवारी दिली आहे. तसेच सचिन सावंत यांच्या जागी अशोक जाधव यांची अंधेरी पश्चिमेतील निवड झाली आहे. (हेही वाचा - Maharashtra Assembly Elections 2024: शिवसेना एकनाथ शिंदे गटाची दुसरी उमेदवारांची यादी जाहीर; कुडाळमधून नितेश नारायण राणेंना उमेदवारी तर वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मिलींद देवरा रिंगणात )
काँग्रेसने 14 उमेदवारांची नवी यादी केली जाहीर
Congress releases another list of 14 candidates for the upcoming #MaharashtraAssemblyElections2024
Andheri West candidature - Sachin Sawant replaced by Ashok Jadhav pic.twitter.com/jG5F6cms29
— ANI (@ANI) October 27, 2024
नव्या यादीत अमळनेरमधून डॉ. अनिल नाथू शिंदे, उमरेडमधून संजय नारायणराव मेश्राम, आरमोरीतून रामदास मसराम, चंद्रपूरमधून प्रवीण नानाजी पडवेकर, बल्लारपूरमधून संतोषसिंह चंद्रसिंग रावत आणि वरोरामधून प्रवीण सुरेश काकडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय नांदेड उत्तरमधून अब्दुल सत्तार अब्दुल गफूर, औरंगाबाद पूर्वमधून लहू एच. शिवले, नालासोपारा येथून संदीप पांडे, अंधेरी पश्चिममधून अशोक जाधव, शिवाजी नगरमधून दत्तात्रेय बहिरट, पुणे कॅन्टोन्मेंटमधून रमेश आनंदराव भागवे, दक्षिण सोलापूरमधून दिलीप ब्रह्मदेव माने यांची निवड करण्यात आली आहे. तर पंढरपूरमधून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाच्या या नव्या यादीत अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत या उमेदवारांना आपापल्या भागात कितपत पाठिंबा मिळतो, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.