Rahul Gandhi | (Photo Credit - Twitter)

सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी वड्रा (Priyanka Gandhi Vadra) यांपैकी कोणीही काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाहीत. त्यामुळे पाठिमागील जवळपास 24 वर्षांनंतर प्रथमच काँग्रेस अध्यक्षपदावर गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती दिसणार आहे. दरम्यान, अध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राहुल गांधी हे नेमके कोठून मतदान करणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी रविवारी सांगितले की, राहुल गांधी मतदानादिवशी 'भारत जोडो' यात्रेत असतील. या यात्रेदरम्यान ते कर्नाटकातील बल्लारी जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेच्या शिबिराच्या ठिकाणी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत. राज्यसभा सदस्य जयराम रमेश म्हणाले की, म्हणाले की माजी पक्षप्रमुख उद्या कुठे मतदान करतील याबद्दल कोणतीही अटकळ नसावी.

राहुल गांधी यांच्या मतदानाबद्दल माहिती देताना जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राहुल गांधी उद्या कुठे मतदान करतील याबद्दल शंका उत्पन्न केल्या जात आहेत. परंतू, त्याबाबत कोणताही अट्टाहास नसावा. ते संगनकल्लू, बल्लारी येथील Bharat Jodo Yatra शिबिराच्या ठिकाणी मतदान करणार आहेत.

पक्षाच्या सर्वोच्च पदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खडगे यांच्यात लढत होत आहे. खडगे हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय मानले जातात. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा या शर्यतीत नसल्यामुळे, 24 वर्षांनंतर प्रथमच गैर-गांधी व्यक्तीमत्व पक्षाचे नेतृत्व करणार आहेत.

इलेक्टोरल कॉलेजचा समावेश असलेल्या 9,000 पीसीसी प्रतिनिधींना आकर्षित करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी अनेक राज्यांमध्ये प्रचार केला आहे. थरूर यांनी असे म्हटले आहे की गांधी कोणत्याही उमेदवाराला पाठीशी घालत नाहीत. परंतू त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि पीसीसी प्रमुखांकडून केलेल्या कथित भिन्न वर्तनाबद्दल वारंवार तक्रार केली आहे

थरूर यांनी शनिवारी ठामपणे सांगितले की तरुण आणि पक्षातील "खालच्या स्तरातील" लोक त्यांना पाठिंबा देत आहेत, तर वरिष्ठ खर्गे यांना पाठिंबा देत आहेत. जोर देत थरुर म्हणाले, मला तरुण मतदारांचा पाठिंबा मिळत आहे. मला खालच्या स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वरिष्ठ खरगे यांच्यासोबत जात आहेत. आम्ही बदलाबद्दल बोलत आहोत आणि वृद्ध लोक त्याचा प्रतिकार करतात," असे थरूर यांनी त्यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.