Photo Credit-Twitter

Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' नाशिकवरुन आज पालघरमध्ये (Bharat Jodo Nyay Yatra in Palghar ) दाखल झाली. या प्रवासात त्यांनी जव्हार, वाडा, मोखाडा करत पालघर गाठले. त्यानंतर ते थेट ठाण्यामध्ये दाखल होणार आहे. या यात्रेमध्ये राहुल गांधींचे(Rahul Gandhi) अनेक रोड शो झाले आहेत. भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Yatra) नागरिकांचा मिळता प्रतिसाद पाहून राहूल गांधीनी 'भारत जोडो न्याय यात्रा' सरू केली. जनतेशी संवाद साधत त्यांचे प्रश्न संपूर्ण भरतासमोर मांडत ते आगेकूच करत आहेत. न्याय यात्रेदरम्यान ते स्थानिकांचे प्रश्न आपल्या भाषणातून मांडत मुद्दे समोर आणत आहेत. (हेही वाचा:Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra: भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल, राहुल गांधी आक्रमक; काँग्रेस पक्षाचे धोरण स्पष्ट)

पालघर, भिवंडी आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ही यात्रा आज असणार आहे. त्यामुळे आदिवासी भाग म्हणून आदिवासी जनतेच्या प्रश्नावर राहुल गांधी लक्ष केंद्रित करतील. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आज 62वा दिवस असून ही यात्रा गेल्या तीन दिवसांपासून राज्यात आहे. आजच्या सभेत राहुल गांधी कोण काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. (हेही वाचा:Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' 10 मार्च रोजी महाराष्ट्रात दाखल होणार; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम)

भारत जोडो न्याय यात्रेला पालघर जिल्ह्यातील मोखाडा इथून सुरुवात झाल्यानंतर जव्हार आणि विक्रमगड याठिकाणी यात्रेचं स्वागत करण्यात आलं. वाडा इथं दुपारचं जेवण करण्यात येणार आहे. त्यानंतर वाड्यातील कुडुस इथून यात्रेला दुपारी पुन्हा सुरुवात होणार आहे. पालघर जिल्ह्यातून ही यात्रा ठाण्यात प्रवेश करणार आहे. ठाण्यात प्रवेश केल्यानंतर आंबडी इथं यात्रेच कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येणार आहे. संध्याकाळी 5 वाजता ही यात्रा ठाण्यातील भिवंडीत दाखल होईल. तिथे राहुल गांधी हे लोकांशी संवाद साधतील. त्यानंतर ठाण्यातील सोनाले मैदानावर या यात्रेचा मुक्काम असणार आहे.

14 जानेवारीला मणिपुरच्या इंफाळ इथून या यात्रेला सुरुवात झाली. त्यानंतर मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात राज्यांमधून प्रवास केल्यानंतर आता महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ही यात्रा 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांतील असून 6200 किलोमीटरचं अंतर पार करणार आहे.