काँग्रेस नेते, पलूसचे आमदार विश्वजित कदम यांच्या गाडीला अपघात; थोडक्यात बचावले

मुंबईहून (Mumbai) पुण्याला (Pune) येत असताना विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्या वाहनाला अपघात झाला असून ते थोडक्यात बचावले आहे. एका दुचाकीस्वराला वाचवण्याच्या प्रयत्नात विश्वजित कदम यांचे वाहन एका झाडाला धडकले. हा अपघात आज गुरुवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास घडला. त्यावेळी कदम यांच्यासोबत त्यांचे सचिव देखील होते. महत्वाचे म्हणजे, कदम यांच्यासोबत घडणारा मोठा अपघात टळला असून त्यांच्या किरकोळ जखम झाली आहे. यामुळे कदम यांचे समर्थकांमध्ये चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या कदम हे सुखरुप असून कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे त्यांनी जनतेला आवाहन केले आहे.

लोकमतने दिलेल्या माहितीनुसार, आमदार विश्वजित कदम यांची मर्सिडीज कार मुंबईहून पुण्याला निघाली होती. दरम्यान, कदम यांच्या वाहनासमोर अचानक एक दुचाकी आली. दुचाकीस्वराला वाचवताना कदम यांचे वाहन जवळील झाडाला जाऊन धडकले. धडक मोठी असली तरी वाहनांमधील एअर बॅगमुळे कदम थोडक्यात बचावले आहेत. मात्र, त्यांच्या खांद्याला किरकोळ जखम झाली आहे. या अपघातात मात्र कदम यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाल्याचे कळत आहे. हे देखील वाचा- भाजप आज 'सत्ता स्थापने'चा दावा करणार नाही; सुधीर मुनगंटीवार 'महायुती'चं सरकार स्थापन करण्यावर ठाम

मुबंईहून त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे ही बातमी खरी आहे. ते सुखरुप असून या अपघातात कोणालाही गंभीर जखम झाली नाही. तसेच कोणत्याही अफवांना जनतेने बळी पडू नये आवाहनही विश्वजित कदम यांनी केले आहे.