भाजप आज 'सत्ता स्थापने'चा दावा करणार नाही; सुधीर मुनगंटीवार 'महायुती'चं सरकार स्थापन करण्यावर ठाम
Sudhir Mungantiwar | Photo Credits: Twitter/ ANI

महाराष्ट्रात सत्ता संघर्ष शिगेला असताना आता शिवसेना - भाजपा यांचा एकमेकांवर पलटवार सुरू आहे. आज मुंबईमध्ये भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. भाजपा स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याचं म्हटलं आहे. यावेळेस कॉंग्रेस- भाजपाच्या संबंधांवर बोलताना मतदारांचा कौल महायुतीच्या बाजुने आहे. कॉंग्रेस विरोधी पक्षातच बसणार आहे. पण अल्पमतातील सरकारही येणार नसल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तसेच महायुतीवर ठाम असलेले सुधीर मुनगंटीवारांनी देवेंद्र फडणवीसही 'शिवसैनिक' आहेत. त्यामुळे त्यांच्या रूपाने पुन्हा 'शिवसैनिक' देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असा आशावाद व्यक्त केला आहे. 9 नोव्हेंबरला सद्य विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने पुढे काय होऊ शकतं? यासाठी आज भाजप नेते राज्यापालांसोबत चर्चा करणार आहे.

संघ राजकारणात नाही त्यामुळे ते सत्ता स्थापनेमध्ये सहभागी होणार नाही. तसेच सरसंघचालकांची भेट कोणीही घेऊ शकतं. आज पत्रकार परिषदेमध्येही पुन्हा गोड बातमी येणार असल्याचं म्हटलं आहे. भाजपा- शिवसेनेचे 30 वर्षांचे मधूर संबंध आहेत. त्यामुळे आता आम्ही पुन्हा एकत्र येणार असल्याचा पुनरूच्चार केला आहे. दरम्यान आम्ही सेनेशिवाय कोणालाही भेटलो नाही असं म्हटलं आहे.

ANI Tweet  

शिवसैनिक फोडण्याच्या बातम्यांवर भाजपाकडून नकार देण्यात आला आहे. भाजपाकडून डेड लॉक नाही. तसेच शिवसैनिक फुटू शकत नाही. त्याची काही गरज नाही. आज दुपारी भाजपाचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. तो पर्यंत काही गोष्टींबाबत वेट अ‍ॅन्ड वॉच आहे. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रश्नपत्रिका बनवावी आणि आम्ही उत्तरं द्यावी असं होऊ शकतं नाही. त्यामुळे दोन पक्षांमध्ये चर्चा करून स्थिर सरकार स्थापन करू असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.