शिवसेनेचा 'गेम' भाजप-राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून केला?, काँग्रेस आमदाराच्या प्रसिद्धीपत्रकामुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या
Political parties in Maharashtra | (Photo Credit: Archived, edited, representative images)

सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करुनही राज्यपालांनी दिलेल्या वेळेत शिवसेना बहुमत सिद्ध करु शकली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षाचे पाठिंब्याचे पत्र वेळेत न मिळू शकल्याने असे घडले. सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप बुहमताच्या आकडा गाटता न आल्याने पहिल्या फेरीतच बाद झाला. पहिले दोन पक्ष बहुमत सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आता संख्याबळात राष्ट्रवादी काँग्रेस या क्रमांक तीनच्या पक्षाला निमंत्रण दिले आहे. या वरुन काँग्रेस आमदार हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेना पक्षाला सत्तास्थापन करण्याचा पूर्ण अधिकार आहे. शिवसेनेला दिलेल्या वेळेत बहुमत सिद्ध करता आले नाही. मात्र, असे असले तरी, शिवसेनेला सरकार स्थापन करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे राठोड यांनी म्हटले आहे. राठोड यांनी आपली भूमिका एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली आहे.

हरीभाऊ राठोड यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ज्या पक्षाचे किंवा आघाडीचे 50 टक्क्यांहून अधिक सदस्य निवडणून आले असतील त्या पक्ष किंवा आघाडीला सरकार स्थापन करण्यास सांगणे हे राज्यपालांचे कर्तव्यच आहे. त्यामुळे सत्तास्थापनेस सर्वात मोठा पक्ष असलेला भाजप अयशस्वी ठरल्यानंतर शिवसेना प्राप्त स्थितीमध्ये शिवसेनेसच सरकार स्थापन करण्यास सांगावे लागेल. संविधानामध्ये मख्यमंत्र्यांचा शपथविधी करुन घेण्यासाठी सार्वजत्रिक निवडणुकीनंतर एखाद्या राजकीय पक्षाला 24 ताचाच्या आत सरकार बनवा असे सागता येत नाही. त्यामुळे शिवसेनेची काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षासोबत सत्तास्थापन करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असताना आणि शिवसेना नेते राज्यपालांनी ठरवून दिलेल्या वेळेत सरकारस्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनात पोहोचले असताना, त्यांचा सत्तास्थापनेचा दावा राज्यपाल अमान्य करु शकत नाहीत. (हेही वाचा, Maharashtra Government Formation: राज्यपाल राष्ट्रवादी काँग्रेस ला देणार सत्ता स्थापनेची संधी की महाराष्ट्रात लागणार राष्ट्रपती राजवट?)

हरिभाऊ राठोड यांनी पुढे म्हटले आह की, सध्यास्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हे असंवैधानिक ठरेल. आता राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीला पाचारण केले आहे. मात्र, राष्ट्रवादीला शिवसेनेने पाठिंबा दिला नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. त्यामुळे पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेलाच सरकारस्थापनेसाठी पाचारण करावे लागेल. असे घडले नाही तर, शिवसेना पक्षाचा गेम झाला आणि हा गेम भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळून केला असेच सिद्ध होईल. त्यास जनता कधीही माफ करणार नाही, असेही हरिभाऊ राठोड यांनी म्हटले आहे.