Prithviraj Chavan On BJP: भाजप नेत्यांचा तोकडेपणा आणि दळभद्री पणा समोर आला- पृथ्वीराज चव्हण
Prithviraj Chavan | (Photo Credits: Facebook)

तळागाळातील घटकांचा विचार करुन त्यांना मदतीचे अश्वासन दिल्यानंतर राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी तसा निर्णय जाहीर केला. यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाविकासआघाडी सरकारने लॉकडाऊनपूर्वी जाहीर केलेल्या पॅकेजचे पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan यांनी कौतुक केले आहे. तर विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना भाजप (BJP) नेत्यांचा तोकडेपणा आणि दळभद्री पणा समोर आला असा घणाघात केला आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याची चर्चा सुरु होती तेव्हा सर्वसामान्यांना काहीतरी मदत करा. आगोदर त्यांच्या खात्यावर काही रक्कम जमा करा आणि त्यानंतरच लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घ्या, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते. त्यानुसार राज्य सरकारने आता निर्णय घेतल्यावर चव्हाण यांनी सरकारचे कौतुक केले आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारचे कौतुक करत म्हटले आहे की, कोरोना संकटामुळे राज्य अडचणीत आहे. राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. राज्याच्या तिजोरीतही फार काही शिल्लख नाही. राज्याची तिजोरी मोकळी असतानाही राज्य सरकारने सर्वसामान्यांना 5400 कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. हे थोड्या दिवसांसाठी असले तरी महत्त्वाचे आहे. लवकरच आपण कोरोना व्हायरस संसर्गाची साकळी तोडू आणि राज्य पूर्वपदावर आणू असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसतानाही सरकारने शिवभोजन थाळी, रिक्षाचालकांना आणि इतर योजनांच्या लाभार्थ्यांना मदत करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी राज्य सरकारचे अभिनंदनच करेन असे चव्हाण यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, COVID 19 in Maharashtra: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची PM Modi यांना पत्र लिहून राज्यात 100% लसीकरणासाठी मुभा मिळावी म्हणून मागणी)

विरोधकांवर टीका करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, कोरोना काळात भाजप नेत्यांचा तोकडेपणा आणि दळभद्री पणा समोर आला. देश पातळीवर विचार करता कोरोना काळात जगभरातील विविध देशांनी कोट्यवधी रुपयांची पॅकेज जाहीर केली. त्या तुलनेत भारताचा विचार करता केंद्रातील मोदी सरकारने पहिल्या लॉकडाऊनमध्ये अत्यांत तुटपूंजी मदत केली आह. देशातील ज्या घटकांचे पोट हातावर आहे अशा घटकांना केंद्र सरकारने मदत केली पाहिजे ही भूमिका आपण सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारकडे मांडत होतो, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.