Prithviraj Chavan | (Photo Credits: Facebook)

नव्याने आलेल्या कोरोना व्हायरस (New Coronavirus) बाबत स्पष्टता येईपर्यंत केंद्र सरकानेर युनायटेड किंगडममध्ये (United Kingdom जाणाऱ्या सर्व विमानांचे उड्डाण थांबवायला हवे. तसेच, युके (UK) मधून येणाऱ्या सर्व विमानांतील प्रवाशांना काही काळ अलगीकरणात ठेवणे आवश्यक आहे, असे काँग्रेस नेते (Congress Leader) पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हटले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारला सल्ला दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेला इशारा आणि केंद्र सरकारला केलेले आवाहन जागतिक परिस्थीती पाहता अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना व्हायरसवर लस निर्मिती करण्यात संशोधकांना यश आले आहे. कोरोनाची लस जगभरातील सर्व नागरिकांना लवकरच उपलब्ध होऊ शकेल अशी आशा असतानाच पुन्हा एकदा धक्कादायक माहिती आहे. यूनायटेड किंग्डम येथे कोरोना व्हायरसचा एक नवाच प्रकार पुढे आला आहे. नव्या कोरोना विषाणूमुळे पुन्हा एकदा जगासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. जगभरातील अनेक देश सतर्क झाले आहे. यूरोपीय यूनियनमधील अनेक देशांनी यूकेवरुन येणाऱ्या सर्व विमानांवर प्रतिबंध लावले आहेत. (हेही वाचा, Italy मध्ये आढळला Britain मधील कोरोना वायरसच्या नव्या प्रजातीच्या विषाणूची लागण झालेला रूग्ण)

फ्रांस, जर्मनी, नीदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रिया, इटली आदी देशांनी UK मधून येणाऱ्या विमानांवर प्रतिबंध लावले आहेत. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी देशातील नागरिकांना नाताळ (क्रिसमस) आणि नव्या वर्षांचे स्वागत करत असताना गर्दी न करण्याचे अवाहन केले आहे. गर्दी केल्यामुळे कोरोना व्हायरस संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, असेही जॉनसन यांनी म्हटले आहे. इंग्लंडमध्ये नव्याने लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जॉनसन यांचे अवानह पाहताच सतर्क होत जगभरातील अनेक देशांनी यूकेतून येणाऱ्या विमानांबाबत सतर्कता बाळगली आहे. तर, युकेला जाणाऱ्या विमानांवर मोठ्या प्रमाणावर बंदी घातली आहे. (हेही वाचा, Prithviraj Chavan On PM Narendra Modi: कोरोना, चीन प्रश्न, अर्थव्यवस्था या प्रश्नांवर 'मोदी सरकार' साफ अपयशी ठरलं आहे; पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधानांवर निशाणा)

फ्रान्स देशाने युकेवर 48 तासांसाठी प्रवासबंदी लागू केली आहे. जेणेकरुन या काळात नव्याने आढळलेल्या कोरोना विषाणूचा अभ्यास आणि त्याच्या नियंत्रणासाठी तयारी करण्यास अवधी मिळावा, अशी यामागची भूमिका आहे. फ्रान्सशिवाय जर्मनीनेही युकेतून येणाऱ्या विमानांवर रविवारी प्रतिबंध लावले होते. युकेतून आलेल्या प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जात आहे. युके मध्ये आढळलेल्या नव्या विषाणूमुळे जग चिंतेत गेले आहे. अमेरिकाही या स्थितीवर लक्ष ठेऊन आहे. जागतिक आरोग्य संघटना इंग्लंडसोबत चर्चा करीत आहे.