शिवसेना पक्षासोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस उत्सुक, बाळासाहेब थोरात यांच्याकडून खुली ऑफर
उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात (Photo Credits- File Image)

विधानसभा निवडणूकचे निकाल गुरुवारीच स्पष्ट झाले. त्यानंतर आता सत्ता स्थापनासाठी हालचाली सुरु झाल्या असून शिवसेनेकडून आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी केली जात आहे. तसेच निकालानंतर शिवसेना-भाजप महायुतीने बहुमताचा आकडा जरी पार केला आहे. पण आता काँग्रेसकडून शिवसेनेला सत्ता स्थानपनेसाठी खुली ऑफर बाळासाहेब थोरात यांच्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना काँग्रेसची ऑफर स्विकार करणार का याकडे आता लक्ष लागले आहे.

काँग्रेसला विधानसभा निवडणूकीत 44 जागांवर विजय मिळवला आहे. तर अपेक्षित नसताना सुद्धा काँग्रेसला मिळालेल्या जागांसाठी आनंद व्यक्त करण्यात येत आहे. त्याचसोबत बहुमताचा आकडा शिवसेना-भाजप महायुतीने पार केला असला तरीही तो सत्तेच्या विरोधातील कल असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. शिवसेनेकडून काँग्रेससोबत सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आला नाही आहे पण आम्ही त्यांच्यासोबत सत्ता स्थापनासाठी उत्सुक असल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता शिवसेना काँग्रेससोबत सत्ता स्थापन करणार का याची चर्चा सुरु झाली आहे.तसेच काँग्रेसला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळाला असून आमदारांची मानसिकता बदलली आहे. त्यामुळे 10 आमदार आमच्या संपर्कात असल्याचे धक्कादायक विधान थोरात यांनी केले आहे. मात्र नेमक्या कोणत्या पक्षाचे आमदार संपर्कात आहेत हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.(उद्धव ठाकरे, प्रशांत किशोर यांच्यात 'मातोश्री'वर चर्चा?, सत्तास्थापनेपूर्वी शिवसेनेच्या गोटात खलबतं)

दुसऱ्या बाजूला विधानसभा निवडणूकीचे निकाल लागण्यापूर्वी विविध मीडिया कंपन्यांनी यंदा कोणाची सत्ता स्थापन होणार याचे एक्झिट पोल त्यांच्या वहिन्यांवर दाखवले. मात्र मीडिया कंपन्यांनी दाखवलेल्या हे एक्झिट पोल चुकीचे ठरले. एवढेच नाही ज्या उमेदवारांना मत मिळणार नाही असे दिवसभर दाखवले तेच मताधिक्य मिळवत विजयी झाले आहेत. त्यामुळे आता खोटा एक्झिट पोल दाखवणाऱ्या कंपन्यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.