काँग्रेस नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांनी राज्यसभेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राजीव सातव यांच्या नावाव्यतिरिक्त या मुकूल वासनिक, रजनी पाटील, सुशीलकुमार शिंदे यासह अनेक नावं चर्चेत होती. पंरतु, काँग्रेसकडून सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजीव सातव हे काँग्रेस माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विश्वासू गोटातीव नेते आहेत.
राजीव सातव यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. राजीव सावत हे सध्या ते गुजरातचे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. 2009 मध्ये ते कळमनुरी मतदारसंघातून आमदार झाले होते. तसेच 2014 मध्ये हिंगोली मतदारसंघातून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. राजीव सातव यांना वयाच्या 45व्या वर्षी राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. (हेही वाचा - नागपूरमध्ये 2 जणांना कोरोनाची लागण; शहरातील बाधित रुग्णांची संख्या 3 वर पोहचली; 13 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
Maharashtra: Congress candidate for Rajya Sabha, Rajiv Satav, files his nomination papers in the presence of Chief Minister and Shiv Sena chief Uddhav Thackeray in Mumbai. pic.twitter.com/4ujUUwicBE
— ANI (@ANI) March 13, 2020
दरम्यान, राजीव सातव यांची राजकीय कारकीर्द पंचायत समितीपासून सुरु झाली. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनदेखील काम पाहिलं. राज्यातील 7 जागांसाठी येत्या 26 मार्चला निवडणूक पार पडणार असून त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण 19 जागा आहेत. राज्यसभेत एकूण 17 राज्यांतील 55 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2020 मध्ये संपत आहे. राज्यसभेतील महाराष्ट्रातील एकूण 7 सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2020 रोजी संपत आहे. त्यामुळे या जागेसाठी निवडणुका घेतल्या जात आहेत.