Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
1 minute ago

मुंबई: खासगी रुग्णालयातील 80 कर्मचारी घरी देखरेखीखाली; 13 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या टीम लेटेस्टली | Mar 13, 2020 11:49 PM IST
A+
A-
13 Mar, 23:49 (IST)

मुंबईतील खासगी रूग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची कोरोना व्हायरसची चाचणी सकारात्मक आल्यानंतर, जवळपास 80 कर्मचाऱ्यांना घरीच वेगळे ठेवण्यात आले असून ते निरीक्षणाखाली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

13 Mar, 22:43 (IST)

दिल्लीच्या रूग्णालयात 68 वर्षाच्या महिलेचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूमुळे होणारा हा भारतातील दुसरा मृत्यू आहे.

13 Mar, 22:36 (IST)

दुबईला गेलेल्या 40 जणांपैकी, अहमदनगर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा कोरोना व्हायरसचा रिपोर्ट सकारात्मक आला आहे. यासह राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 18 वर गेली आहे. 

13 Mar, 21:54 (IST)

काहीवेळापूर्वी ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोलसोनारो यांची कोरोना व्हायरसची सकारात्मक आल्याची बातमी आली होती, मात्र आता एएफपीच्या वृत्तानुसार ही चाचणी नकारात्मक आल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

13 Mar, 21:15 (IST)

औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे केले गेले, त्यानंतर आता महाराष्ट्र विधानसभेत मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाना शंकरसेठ टर्मिनस असे नामकरण करण्याचा प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला आहे.

13 Mar, 20:49 (IST)

एसबीआय बँकेनेतर आता कोटक सुद्धा येस बँकेत 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.(आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेत 7250 कोटी रुपयांची एसबीआय गुंतवणूक करणार)

13 Mar, 20:33 (IST)

कोरोना व्हायरसमुळे तमिळ येथील शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

13 Mar, 20:18 (IST)

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मध्य रेल्वेकडून रेल्वे गाड्यांची स्वच्छता करण्यात येत आहे.

13 Mar, 20:06 (IST)

Coronavirus: पिंपरी चिंचवड येथील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

13 Mar, 19:48 (IST)

अमेरिकेत अधिक 208 जणांना कोरोना व्हायरसचे संक्रमण झाले असून एकूण आकडा 789 वर पोहचला आहे.

Load More

भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गुरुवारी पुणे आणि मुंबईनंतर ठाण्यातही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळल्याचं स्पष्ट झालं आहे. फ्रान्समधून आलेल्या ठाण्याचा 35 वर्षीय तरुणालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याला कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने पालकांचीही चिंता वाढली आहे. कोरोनाचं संक्रमण टाळण्यासाठी राज्यातल्या शाळा-महाविद्यालयांना तातडीनं सुट्टी जाहीर करा, अशी मागणी पालक संघटनांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

राज्यात कोरोना बाधित रुग्णाची संख्या 14 वर पोहोचली आहे. काही रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शुक्रवारी कर्नाटकात 76 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती.

तसेच प्रभादेवीनंतर मुंबईत पश्चिम रेल्वेवरील आणखी एका स्थानकाचं नाव बदलण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचं नामांतर करण्यात येणार आहे. मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेठ यांच्या नावाने हे स्थानक आता ओळखले जाणार आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसचे ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ स्टेशन असे नामकरण करण्यास ठाकरे सरकारने मंजुरी दिली आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या

दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडीमधील राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठीचा तिढा अखेर सुटला आहे. राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. सध्या राज्यसभेच्या 4 जागांपैकी शिवसेना आणि काँग्रेसला प्रत्येकी 1 जागा आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या आहेत. परिणामी महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचं पारडं जड झालं आहे. शिवसेनेकडून प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसकडून राजीव सातव तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार आणि फौजिया खान हे राज्यसभेचे उमेदवार असणार आहेत.


Show Full Article Share Now