Mission Kavach Kundal Yojana: नाशिकमध्ये मिशन कवच कुंडल मोहीम राबवा, पालकमंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश
Chhagan Bhujbal | Photo Credits: Facebook)

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या पार्दुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लसीकरणाचा वेग वाढवण्यात येत आहे. महाराष्ट्रात 8 ऑक्टोबरपासून मिशन कवच कुंडल योजना (Mission Kavach Kundal Yojana) राबवली जात आंहे. ही योजना एकूण 6 दिवस म्हणजे 14 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. याचपार्श्वभूमीवर येवला व निफड तालुक्याबद्दल नाशिकचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) चिंता व्यक्त केली आहे. या तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी मोहीम स्तरावर जनजागृतीसह कवच-कुंडला मोहिमेत लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात यावी, असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

दरम्यान, छगन भुजबळ आज जिल्ह्यातल्या येवला तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी येवल्यामध्ये सातत्याने वाढत जाणाऱ्या करोना रुग्णांचे प्रमाण चिंता वाढवणारे असल्याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी नागरिकांना पुन्हा लॉकडाउन लाहू करावा लागण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. हे देखील वाचा- Maharashtra Bandh: उद्या राज्यव्यापी बंद साठी मुंबई पोलिस सज्ज; SRPF च्या जवानांसह अनेक ठिकाणी कडक बंदोबस्त

राज्य सरकारकडून राज्यात 8 तारखेपासून मिशन कवच कुंडल योजना राबवली जात आहे. ही योजना 14 सप्टेंबरपर्यंत म्हणजेच 6 दिवस चालवली जात आहे. या योजनेंतर्गरात राज्यात 15 लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे राज्याचे लक्ष्य आहे. केंद्र सरकारने दसऱ्यापर्यंत (15 ऑक्टोबर) 100 कोटी नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर, राज्यात प्रतिदिन 15 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याच लक्ष्य आहे. राज्य सरकारकडे सध्या 75 लाख लसींचा साठा उपलब्ध आहे. तर, आणखी 25 लाख लसी गुरुवारी मिळणार असून लसींचा तुटवडा नसल्याचे राजेश टोपे म्हटले आहे.