Agriculture Minister Dada Bhuse | Photo Credits: Twitter)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (Coronavirus) राज्यातील कृषी व संलग्न अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क (Tuition Fees) भरण्यासाठी सवलत देण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांनी दिली. आज राज्यातील कृषी विद्यापीठांच्या शिक्षण संचालक समितीमध्ये यासंदर्भात ठराव करण्यात आला आहे, असंही दादाजी भुसे यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील तिसऱ्या, पाचव्या व सातव्या सत्राचे शैक्षणिक शुल्क एकरकमी न भरता 3 हप्त्यात सत्र परीक्षा समाप्तीपूर्वी भरायची सवलत देण्यात आली आहे. विद्यापीठांच्या शिक्षण संचालक समितीची बैठक होऊन त्यात शुल्क भरण्यासाठी सवलत देण्याचा ठराव करण्यात आला आहे. (हेही वाचा - लायकी पाहून बोलावे, सूर्याकडे पाहून थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते; अजित पवार यांचं गोपीचंद पडळकर यांना प्रत्यूत्तर)

कोरोना संकटामुळे कृषी व संलग्न अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आगामी शैक्षणिक वर्षांत शुल्क भरण्यासाठी सवलत मिळावी, अशी मागणी राज्यातील विद्यार्थ्यांनी कृषीमंत्र्यांकडे केली होती. यासंदर्भात उपाययोजना करण्याबाबत कृषीमंत्र्यांनी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या कुलगुरू आणि अधिष्ठातांना निर्देश दिले होते.