![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/pranit-more.jpg?width=380&height=214)
सोलापूर मध्ये स्टॅन्डअप कॉमेडियन प्रणित मोरे (Comedian Pranit More) ला झालेल्या मारहाणीमधील प्रमुख आरोपी तनवीर शेख (Tanveer Shaikh) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 2 फेब्रुवारी दिवशी प्रणितला त्याच्या शो नंतर मारहाण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. दरम्यान मारहाण करताना बॉलिवूड अभिनेता वीर पहाडिया वर जोक केल्याच्या रागातून ही मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान वीर ने मात्र आपला या मारहाणीत सहभाग नाही तसेच अशा मारहाणीचं आपण समर्थनही करत नसल्याचं तो म्हणाला आहे.
प्रणित मोरेच्या टीम कडून मारहाणीच्या प्रकारानंतर पोलिसांत तक्रार केल्याचं सांगण्यात आले होते. यामध्ये जेथे मारहाण झाली तेथील सीसीटीव्ही फूटेज दिले जात नसल्याचं सांगण्यात आले होते. प्रणितनेही सोशल मीडीयात एक व्हिडिओ जारी करत पोलिसांनी काहींना अटक केली आहे पण ते अटक केलेले व्यक्ती कोण आहेत ? याची माहिती दिली जात नसल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: Veer Pahariya ची खिल्ली उडवल्याबद्दल प्रसिद्ध कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण, वीर ने 'आपला सहभाग नसल्याचं' म्हणत मागितली माफी.
वीर पहाडीया हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीर नुकताच 'स्काय फॉर्स' सिनेमामधून रसिकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमामधूनच वीरचं बॉलिवूड मध्ये पदार्पण झालं आहे. वीरची आई स्मृती ही सुशीलकुमार शिंदेंची मुलगी आहे. स्मृती पहाडिया देखील निर्मात्या आहेत. 2 फेब्रुवारीच्या घटनेनंतर वीरने सोशल मीडीयातून प्रणित मोरे ची माफी मागत हल्लेखोरांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.