बॉलिवूड अभिनेता वीर पहाडिया वर आपल्या कॉमेडी शो मध्ये टीपण्णी करणं प्रणित मोरेला (Pranit More) महागात पडलं आहे. नुकत्याच त्याच्या सोलापूरच्या शो मध्ये वीर वर जोक केल्याने मन दुखावल्याने 10-12 जणांच्या समुहाने प्रणितला बदडले आहे. ही घटना 2 फेब्रुवारीची आहे. प्रणितचा शो सोलापूर मध्ये 24K Kraft Brewzz मध्ये होता. शो नंतर प्रणित थांबला होता. नेहमी प्रमाणे तो चाहत्यांना सेल्फी देत होता. त्यांच्याकडून फीडबॅक घेत होता. अचानक 10-12 जणं आली. ते प्रणित सोबत फोटो काढण्यासाठी नव्हे तर त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आले होते. त्यांनी प्रणितला मारहाण केली आहे.
टीम प्रणितच्या नावे सोशल मीडीयात पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये सारा प्रकार सविस्तर नमूद केला आहे. प्रणितला खूप मारहाण झाली. त्याला वारंवार मारण्यात आलं. यावेळी हल्लेखोरांनी पुन्हा वीर वर जोक करून तर दाखव अशी धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24K Kraft Brewzz मध्ये सिक्युरिटी नसल्याचं आणि त्यांच्याकडून सीसीटीव्ही फूटेजही दिलं जात नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
प्रणितची पोस्ट
View this post on Instagram
दरम्यान या प्रकारावर अभिनेता वीर ने आपली बाजू स्पष्ट केली आहे. 'या हल्ल्यात माझा सहभाग नाही. अशाप्रकारे प्रणित वर हल्ला होणं चिंताजनक आहे. याबद्दल प्रणीतची माफी मागतो. तसेच दोषींवर कारवाई झालीच पाहिजे असे तो म्हणाला आहे.
वीर ची प्रतिक्रिया
कोण आहे वीर पहेरिया?
वीर पहाडिया या बॉलिवूड अभिनेता आहे. नुकताच तो स्काय फोर्स सिनेमातून रसिकांच्या भेटीला आला आहे. स्काय फोर्सने बॉलिवूड वर चांगली कमाई केली आहे. दरम्यान वीर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशील कुमार यांची लेक स्मृती यांचा लेक आहे. स्मृती पहाडिया निर्मिती क्षेत्रामध्ये आहेत.