Weather | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Weather Forecast: थंडी अल्हाददायक वाटत असली तरी राज्यातून ती हळूहळू आपला गाशा गुंडाळत आहेत. वातावरणातील वाढते तापमान हे थंडी कमी होण्यास कारण ठरत आहे. वातावरण ढगाळ दिसत असले तरी गारवा कमी होत आहे. पुढचे दोन दिवस राज्यात हवामान असेच धुके आणि ढगाळ असलेले मळभयुक्त राहणार आहे. दरम्यान, राज्यातील तापमानात पुढचे दोन दिवस चढ-उतार पाहायला मिळेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. आयएमडीन वर्तवलेल्या अंदाजात विदर्भात पाऊस तर उर्वरीत महाराष्ट्रात सामान्य वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तुरळक पावसाची उपस्थिती

नागपूर आणि उर्वरीत विदर्भा आज काही ठिकाणी तुरळक पावसाची उपस्थिती पाहाला मिळू शकते. बंगालच्या उपसारगातून येणारे बाष्पयुक्त वारे राज्यात ढगाळ वातावरण निर्मितीस कारणीभूत ठरत आहे. त्याचा परिणाम विदर्भावर जाणवत असून वाऱ्याचा झोत कायम राहिल्यास विदर्भात थंडीही वाढू शकते. अशा प्रकारचे वातावरण पुढचे दोन दिवस कायम राहू शकते, असे आयएमडीने हवामान अंदाज वर्तवताना म्हटले आहे.

पुढचे पाच दिवस कसे असेल हवामान?

  • कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागांमध्ये कमाल आणि किमान तापमान स्थिर राहण्याची चिन्हे.
  • पुढचे पाच दिवस वातावरण कायम राहण्याची शक्यता.
  • राज्यात दोन दिवसांनी थंडी परतण्याची चिन्हे.

थंडी गायब

महाराष्ट्रात आर्द्रता आणणारे वारे बंगालच्या उपसारगातून वाहत असल्याने राज्यात तापमान वाढ. परिणामी थंडी गायब झाली आहे. साधारण येत्या रविवारपर्यंत हे चित्र असेच दिसू शकते. मात्र, वातावरणात बदल झाल्यास रविवारनंतर मात्र थंडी काहीशी राज्यात पुन्हा परतू लागेल. त्यानंतर 19 ते 21 जानेवारी या कालावधीत राज्यात थंडी पाहायाल मिळू शकते. मात्र, संपूर्ण जानेवारी महिन्याचा विचार करता राज्यातील थंडीत चढउतार पाहायला मिळू शकते. (हेही वाचा, Maharashtra Weather Update: महाराष्टाचे हवामान बदलते, तापमानात चढउतार, कधी थंडी, कुठे पाऊस; घ्या जाणून)

दरम्यान, राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात आकाश आज (13 जानेवारी) निरभ्र राहील. मुंबईचे आजचे तापमान 26 अंश सेल्सिअस आहे. आजच्या अंदाजानुसार तापमान किमान 20 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग ताशी 10 किमी आहे, सापेक्ष आर्द्रता 54% आहे. सूर्य सकाळी 07.13 वाजता उगवण्यास सुरुवात झाली आणि संध्याकाळी 06.17 वाजता मावळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवार, 14 जानेवारी रोजी तापमान 20 अंश सेल्सिअस पर्यंत घसरले आणि 32 अंश सेल्सिअस पर्यंत वाढले, अंदाजानुसार आकाश बहुतेक निरभ्र राहील. बुधवार, 15 जानेवारी रोजी किमान तापमान 22 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले, अंदाजानुसार पुन्हा एकदा आकाश निरभ्र राहील, असे आयएमडीने म्हटले आहे.