
डॉलरच्या तुलनेत रुपया भलताच घसरल्याने त्याचे परिणाम देशातील सर्वसामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. पेट्रोल, डिझेलने दरांची नव्वदी केव्हाच पार केली. आता ती शंभरी गाठेल की काय अशी भीती असतानाच आणखी एक धक्कादायक वृत्त आले आहे. पेट्रोल, डिझेल नंतर आता सीएनजी गॅस दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
घरगुती वापरातील (देशांतर्गत उत्पादन होणाऱ्या गॅसच्या बेस प्राइज) गॅसच्या तुलनेत १४ टक्के म्हणजेच ३.५ डॉलर (सुमारे २५२ रुपये) प्रति यूनिट वाढ झाल्याचे दिसते. मार्च २०१६मध्ये गॅसची किंमत सर्वाधिक ३.८२ डॉलर (आताच्या दरानुसार सुमारे २७५.१७ रुपये) प्रति युनीट वाढले आहेत. नॅचरल गॅसच्या किमतीत यूएस, कॅनडा, यूके आणि रशियात गॅसचा सहामहिन्याचा सरासरी दर प्रत्येक सहा महिन्यांनी निश्चित केला जातो. गेल्या काही दिवसांपासून रुपयाची किंमत सातत्याने घटत आहे. त्याचा मोठा फटका ग्राहाकंना बसत आहे.
जगभरातील नैसर्गिक वायूची किंमत डॉलरमध्ये असते. हा बाब विचारात घेतली असता, डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला याचा सरळ अर्थ डॉलर महागला असा होतो. त्यामुळे सहाजिकच कोणतीही वस्तू डॉलरमध्ये खरेदी करायचे तर, त्याचे दर चढेच राहतात.नेमका त्यामुळेच सीएनजी, पीएनजी गॅस वितरकांना आणि ग्राहकांना बसणार आहे.