Shivrajyabhishek Din 2020: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवछत्रपतींना त्रिवार मुजरा करत जनतेला दिल्या शुभेच्छा, वाचा ट्विट
Maharashtra CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

संपूर्ण महाराष्ट्रात आज शिवराज्याभिषेक दिनाचा (Shivrajyabhishek Din) उत्साह आणि आनंद पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊनच्या (Lockdown) सावटामुळे लोकांना घराबाहेर पडत येत नसले तरीही घरात राहून तमाम शिवभक्त हा दिवस मोठ्या आनंदात साजरा करत आहे. मेसेजेस, व्हॉट्सअॅप संदेशाच्या माध्यमातून लोक एकमेकांना शुभेच्छा पाठवत आहेत. या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनीही खास ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा! महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला एक अपूर्व मंगल क्षण म्हणजे #शिवराज्याभिषेक दिन असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी या दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. शिवरायांनी दाखवलेल्या वाटेवर पुढे जाऊन हा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाऊया असेही त्यांनी म्हटले आहे. Shivrajyabhishek Din 2020: शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामध्ये खास होत्या 'या' गोष्टी!

शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला या दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या.

दरम्यान शिवप्रेमींमध्ये शिवाजी महाराजांचा हा शिवराज्याभिषेक सोहळा नेमका साजरा कधी करायचा याबाबतही दुमत आहे. काही जण तिथीनुसार हा सोहळा साजरा करतात तर काही जण तारखेनुसार 6 जूनला त्याचं सेलिब्रेशन करतात. यंदा तिथीनुसार, 4 जून दिवशी शिवराज्याभिषेक दिन होता.